स्वतः खासदार असूनही राऊतांनी केली घुसखोरांची पाठराखण!, म्हणाले,
14-Dec-2023
Total Views | 52
नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी संसदेत घुसखोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यावर आता उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, "आज ज्या तरुणांना पकडलं आहे त्यांचा मार्ग चुकला आहे. खरं तर ते ज्या भावना व्यक्त करत होते त्या देशाच्या भावना आहेत. महागाई, बेरोजगारी, अस्थिरता याविषयी अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरु होत्या. हल्ले करणारे मुलं बेरोजगार आहेत. त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही."
"शेवटी वैफल्यग्रस्त होऊन जर तरुण या मार्गाने निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आणि आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. हा चुकीचा मार्ग आहे. या देशातील सुशिक्षित, बेरोजगार, वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देणं गरजेचं आहे. या तरुणांकडून झालेला भावनेचा उद्रेक हा देशासाठी घातक आहे," असेही ते म्हणाले आहेत.