शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना लीगल नोटीस
10-Dec-2023
Total Views | 407
लखनऊ: डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी शुक्रवार, ८ डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला माहिती दिली की, २० ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना तंबाखूच्या ब्रँडचा प्रचार केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. खंडपीठाने ९ मे २०२४ रोजी यासंदर्भात सुनावणी ठेवली आहे.
वकील मोतीलाल यादव यांनी प्रसिद्ध व्यक्ती आणि मान्यवरांच्या, विशेषत: ‘पद्म पुरस्कार विजेत्यांच्या’ जाहिरातींमध्ये किंवा सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या विशिष्ट उत्पादनांच्या किंवा वस्तूंच्या जाहिरातींमध्ये सहभागाबद्दल चिंता व्यक्त करणारी याचिका दाखल केल्यानंतर हे समोर आले आहे.
न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या न्यायालयाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते, ज्यांनी असा युक्तिवाद केला होता की ज्या कलाकारांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना उच्च-प्रोफाइल पुरस्कार मिळाले आहेत, परंतु गुटखा कंपन्यांची जाहिरात करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी. २२ ऑक्टोबर रोजी सरकारला याबाबत निवेदनही देण्यात आले होते, मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला आहे.
डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात दिलेल्या माहीतीनुसार अवमान याचिकेच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली आहे .त्याचबरोबर केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे.
कोर्टाने अमितीभ बच्चन यांनी पान मसाला विकणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवली असल्याचही सांगितल आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये पान मसाला जाहिरातीतुन बच्चन यांनी माघार घेतली होती. तरीही ती जाहीरात प्रदर्शित केल्यामुळे बच्चन यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती.