शेअर मार्केट अपडेट्स: आज शेअर मार्केटमध्ये उत्साहवर्धक वातावरण
मुंबई: आज शेअर मार्केटमध्ये उत्साहवर्धक वातावरण पाहिला मिळाले. इक्विटी इंडायसेसमध्ये सकारात्मक झोनमध्ये दिसले आहे. क्लोजिंग बेलनंतर द निफ्टी ५० इंडेक्स १८१.१५ टक्यांने वाढून १९४११.७५ पूर्णांक झाला होता. बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ५९४.९१ गुणांनी वाढत ६४९५८.६९ पर्यंत गेले आहे. बँक निफ्टी इंडेक्स ३०१.१५ गुणांनी ४३६१९ पर्यंत गेला आहे.
आज मेटल,फार्मा, हेल्थकेअर रिअल्टी, ऑइल, गॅस या शेअर्समध्ये तेजी आढळली. दुसरीकडे एफ एफ सी जी, कनज्यूमर ड्युरेबल्स शेअर्स मध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली आहे.येस बँक, बजाज, वोडाफोन आयडिया, जेपी असोसिएटस या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, सिप्ला, टायटन या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे समजले जात आहे.