'अवतार ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

    30-Nov-2023
Total Views | 35

avtar 3 
 
मुंबई : ह़ॉलिवूडसह जगभरातील इतप भाषिक चित्रपटरसिक प्रेक्षकांना आपल्या अनोख्या दिग्दर्शकीय शैलीने मंत्रमुग्ध करणारे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार चित्रपट घेऊन येत विचारांच्या सर्व सीमाच पार केल्या. 'अवतार' आणि 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटांनी जगभरात बक्कळ कमाई केली. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षक अवतार ३ च्या प्रतिक्षेत आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे अवतार ३ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सुतोवाच दिग्दर्शकांनीच केले आहे.
 
'अवातार 3' चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून पुढच्या प्रकियेत चित्रपट असल्याचे जेम्स कॅमरॉन यांनी सांगितले. दरम्यान, जेम्स यांनीटीव्ही न्यूझीलँडला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ,"प्रोस्ट प्रोडक्शनच्या कामात आम्ही दोन वर्ष व्यस्त आहोत. त्यामुळे १९ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर लवकरच नव्या कलाकृतींवर काम सुरू करू”, असेही ते म्हणाले.
 
'अवतार ३'मध्ये नव्याने काय पाहता येणार?
 
'अवतार ३' मध्ये अग्नि तत्त्वाची सुरुवात आणि दोन नव्या संस्कृतीचा उलगडा केला जाणार आहे. तर 'Na'vi'चा एक अनोखा दृष्टिकोन देखील चित्रपटात पाहता येणार असून पुन्हा एकदा एक वेगळे विश्व प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात सॅम वर्थिंगटन, जो सलदाना, सिगोरनी वीवर, स्टीफन लैंगसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 
'अवतार २' चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी जगभरात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीकडे वळला. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत उपलब्ध आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121