इस्त्रायल करणार एक घाव दोन तुकडे! संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे लष्कराला आदेश

    09-Oct-2023
Total Views |

Israel


मुंबई :
इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. यातच आता इस्रायलने हमाससोबत शेवटचे युद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इस्त्रायलने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून गाझा सीमेवर आपले १ लाख सैनिक तैनात केले आहे.
 
यासोबतच गाझा पट्टीला अन्न, पाणी, वीज आणि इंधन पुरवठा थांबवण्याचे आदेश इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, तरीही हमासकडून सतत हल्ले सुरुच आहेत. आजपर्यंत या युद्धात ८०० इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देण्याचे ठरवले असून इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील ५०० नागरिक ठार झाले आहेत.
 
दरम्यान, अमेरिकेने इस्त्रायलला युद्धात मदत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने अमेरिकेला धमकी दिली आहे. जर अमेरिकेने युद्धात थेट हस्तक्षेप केला तर ते मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ला करणार असल्याची धमकी हिजबुल्लाहने दिली आहे. रविवारी लेबनॉनमधील दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ला केला.
 
दुसरीकडे, हमासकडून १३२ इस्त्रायली लोकांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात येत आहे. या लोकांना गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. हमासने इस्रायलविरुद्धच्या कारवाईला 'अल-अक्सा फ्लड' असे तर, इस्रायलच्या लष्कराने हमासच्या विरोधात 'सोर्ड्स ऑफ आयर्न' असे नाव दिले आहे. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121