जुलै सप्टेंबर महिन्यात उद्योगधंदे तेजतर्रार
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज महासंघाने जाहीर केलेल्या बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स निरीक्षणात सांगितल्याप्रमाणे आधीच्या क्यू १ च्या तुलनेत या दुसऱ्या तिमाहीत विक्री व नव्या ऑर्डर वेगाने वाढल्या आहेत.कॅपिटल युटीलायझेशन बाबतीत अर्ध्याहून अधिक क्षमतेचा वापर यंदा उत्पादनात झाला आहे अशी निरिक्षणे नोंदवण्यात आली.
नवी दिल्ली: जुलै सप्टेंबर तिमाहीमध्ये व्यवसाय उद्योगधंदे तेजतर्रार झाले असून व्यापारांचा व्यवसायातील विश्वास वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीत मोठ्या अपेक्षा असल्याचे एका खाजगी सर्व्हतून सांगण्यात आले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज महासंघाने बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स मध्ये नोंदवण्यात आल्याप्रमाणे पहिल्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत विक्री व उत्पादनाची मागणी किंवा ऑर्डर वेगाने वाढल्या आहेत असे निरिक्षण नोंदवले गेले आहे. या सर्व्हत हे निरीक्षण दोन तृतीयांश हून अधिक सहभाग्यांनी आपले मत मांडले आहे. आधीच्या तुलनेत ५ गुणांने व्यवसाय वृद्धी झाली असून कॅपिटल युटीलायझेशनचा बाबतीत अर्ध्याहून अधिक सुमारे ७५ ते १०० टक्यांदरम्यान उत्पादन क्षमतेचा वापर झाल्याचे दर्शविले गेले आहे.
मागच्या आठवड्यात हा खाजगी सर्व्हे प्रकाशित झालेला होता. सेवा व उत्पादन क्षेत्रातील मागणी लक्षात घेता या क्षेत्रात आगामी काळात मोठा लाभ होऊ शकतो. S & P Global चा पीएमआय इंडेक्स ६०.९ वरून ६१ टक्के इतका वाढला आहे. गेल्या १३ वर्षातील वृद्धीदर पाहता हा सर्वाधिक दर पहायला मिळाला.
मागच्याच आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने याचा दिलास एक्स्पोर्ट ड्युटी मध्ये मिळू शकतो.