नेटाफिम इंडिया बाजारात सादर करीत आहे तूफान, शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि क्लॉग-रजिस्टन्ट ठिबक तंत्रज्ञान

2025 सालापर्यंत भारतभरातील 25,000 हेक्टरपर्यंत व्याप्ती वाढवण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य बहुहंगामी तसेच बहुपीक उपयोगी क्रांतिकारी टर्ब्युनेक्स्ट™ तंत्रज्ञानाने हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे

    30-Oct-2023
Total Views | 43
   
Toofan
 
नेटाफिम इंडिया बाजारात सादर करीत आहे तूफान, शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि क्लॉग-रजिस्टन्ट ठिबक तंत्रज्ञान
 
 
2025 सालापर्यंत भारतभरातील 25,000 हेक्टरपर्यंत व्याप्ती वाढवण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य
बहुहंगामी तसेच बहुपीक उपयोगी क्रांतिकारी टर्ब्युनेक्स्ट™ तंत्रज्ञानाने हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे
 

मुंबई: नेटाफिम इंडिया या अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने तूफान हे आपले अनोखे बहू आयामी उत्पादन बाजारात आणले आहे. विविध प्रकारच्या पीक लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कायापालट घडवून आणण्याची खात्री देणारे हे एक नवोन्मेषकारी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने, 2025 सालापर्यंत भारतातील, 25,000 हेक्टर जमिनीवर सेवा देण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. या प्रकारातील सर्वोत्तम अँटि-क्लॉगिंग (ड्रीपर बंद होण्यास प्रतिरोध करणारे) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी व अन्नद्रव्ये सुयोग्य प्रमाणात पुरवण्याची निश्चिती ही नवोन्मेषकारी प्रणाली करते. यातील ठिबक नळीची (ड्रिप लाईन) तन्यता अधिक असल्यामुळे तो 40% अधिक मजबूत आहे. भारतीय बाजारपेठेतील सध्याच्या तसेच उपलब्ध पातळ (थीन वाल) साहित्यापासून तयार केल्या जाणाऱ्या नॉन-प्रेशन-कॉम्पेन्सेटेड (एनपीसी) ड्रिप लाईन्सच्या तुलनेत नेटाफिमचे तूफान हे उत्पादन 20% अधिक परवडण्याजोगे आहे.
 
 
नेटाफिम इंडियाचे तूफान हे सर्वांना उपलब्ध होण्याजोगे आधुनिक, कार्यक्षम ठिबक सिंचनोपयोगी उत्पादन तर आहेच, शिवाय ते खरेदी करण्याची प्रक्रियाही अत्यंत सुलभ आहे. सबसिडी मर्यादांच्या पलीकडे जाणारी ही प्रक्रिया आहे. हे किफायतशीर ठिबक तंत्रज्ञान बहू भूधारक तसेच अल्पभूधारक सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यांची सबसिडी पात्रतेच्या कोणत्याही बंधनाशिवाय हे उत्पादन त्यांना उपलब्ध आहे. यातील ड्रिप लाईन ही झटपट जोडणी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका दिवसात 10 एकरांपर्यंत जमिनीवर आस्थापित करता येते. या क्रांतिकारी सुविधेमुळे वेळ व संसाधन दोन्हीमध्ये बचत होते.
 
 
या उत्पादनाचा डिजिटल लाँच नेटाफिम इंडियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर करण्यात आला आणि 10 लाखांहून अधिक शेतकरी व डीलर्स ह्यांनी ह्या उत्पादनामध्ये रस दाखवला. नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व नेटाफिम लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणधीर चौहान यांनी या व्हर्च्युअल लाँचदरम्यान उत्पादन सर्वांसाठी सादर केले. नेटाफिम इंडियाचे तूफान हा क्रांतिकारी टर्बोनेक्स्ट तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेला एक किफायतशीर पर्याय आहे आणि ह्या उत्पादनाचा टिकाऊपणा अद्वितीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होणार आहे. सपाट क्षेत्रावर ओळींमध्ये लावल्या जाणाऱ्या कोणत्याही पिकासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.
 
 
श्री. रणधीर चौहान, नेटाफिम लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक उत्पादनाबद्दल म्हणाले, “ शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण व एकसमान उत्पन्न तर देईलच, शिवाय, त्यांचा कार्यात्मक खर्चही कमी करेल अशी परवडण्याजोगी, उच्च कामगिरी करणारी सुक्ष्म ठिबक सिंचन प्रणाली पुरवण्याचे उद्दिष्ट नेटाफिम इंडियापुढे आहे. शेतकऱ्याचे हित विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फायद्याची व त्यांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादने आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. भारतातील कृषीक्षेत्राच्या यशोगाथेचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यांमध्ये बदल घडवून आणणारी नवोन्मेषकारी उत्पादने देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. क्लॉग (ड्रीपर बंद होणे) प्रतिबंधासाठी नवीन मापदंड स्थापित केल्याचा तसेच तूफान ड्रिपलाईन्सच्या माध्यमातून शेतीची कामगिरी सुधारल्याचा आम्हाला आनंद वाटतो. नेटाफिमचे तुफान कृषी क्षेत्राला स्तरावर घेऊन जाण्यास, शेतकऱ्यांना सबसिडीसाठीच्या मर्यादांपलीकडे जाऊन आधुनिक ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याची क्षमता वाढवण्यास तसेच अभूतपूर्व वेगाने उत्पादन स्थापित करण्याची सुविधा देण्यास नेटाफिमचे तूफान सज्ज आहे. भारतातील जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या कृषी क्षेत्राला मदत करण्याप्रती आमची बांधिलकी ह्या क्रांतिकारी पेटण्ट तंत्रज्ञानातून स्पष्ट होते."
 
 
पाण्याचा दर्जा कसाही असला तरी नेटाफिमचे तूफान मोठ्या गाळण (फिल्ट्रेशन) क्षेत्राद्वारे कमी प्रवाहदराने पाणी देते आणि पिकांना सातत्यपूर्ण प्रवाहाद्वारे पाणी मिळत राहील याची निश्चिती करते. ड्रीपरमधील प्रवाह पथमध्ये (लेबीरिंथ) पाण्याचे टर्ब्युनेक्स्ट चक्र/ भोवरा गाळ ड्रिपरमधून बाहेर टाकत राहते. त्यामुळे क्लॉगिंग होत नाही. ह्या उत्पादनाचा भौमितिक आकार अनन्यसाधारण आहे. ड्रीपरमधील प्रवाह पथमध्ये (लेबीरिंथ) दंताकार रचनेमुळे प्रवाहाचा जोर वाढतो. कमी प्रवाह दरामुळे आणि में व सबमेन लाईनची तसेच कनेक्टर्सची संख्या कमी होते. अशा रितीने अंतिमत: प्रणालीवरील व मजुरीवरील खर्च प्रतिहेक्टर अनुक्रमे 20 आणि 25 टक्क्यांनी कमी होतो.
 
 
बहुहंगामी प्रणाली ही पृष्ठभागावरील व पृष्ठभागाखालील (एसडीआय) ठिबक सिंचनासाठी उपयुक्त आहे. कृषी क्षेत्रामध्ये नवीन युग आणण्याची तसेच भारतीय शेतकऱ्यांना शाश्वत व दर्जेदार पीक घेण्याची क्षमता देण्याची ग्वाही हे उत्पादन देते. हे क्रांतिकारी उत्पादन 16 मिलीमीटर व्यासाच्या ठिबक ननळीसह सोयीस्कर 600 मीटरच्या बंडलमध्ये उपलब्ध आहे. तसेच ड्रिपरचा प्रवाहदर 1.0 ली. प्रति तास ते 2.2 लिटर प्रति तास अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तूफानचा वापर केल्यास शेतकऱ्यांना 40% अधिक मजबुती, अधिक तन्यता, तडे न जाणे तसेच अधिक विस्ताराची क्षमता आणि सुधारित नील किरण प्रतिरोध ह्यांचा अनुभव येईल. त्यामुळे उत्पादनाचे आयुष्य वाढेल.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121