शिवतीर्थावर ठाकरेंच्या भाषणात कोणते मुद्दे गाजणार?

    24-Oct-2023
Total Views | 43
 
Uddhav Thackeray
 
 
मुंबई : दादरमधील शिवतीर्थावर ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडणार आहे. दसरा मेळाव्यातील उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत आहेत. ठाकरें-शिंदेंच्या भाषणांकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्त्वाचा समजला जात आहे. सकाळपासून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे.
 
दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातुन ठाकरेंच्या भाषणाची झलक पाहायला मिळत आहे. अहंकाराचा नाश होईल. असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात अजुन काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
 
शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर सभेच्या ठिकाणी १२ हजार पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सजावट करण्यात आली आहे. तर आज उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत.
 
 
मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणात कोणते मुद्दे गाजणार?
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शिंदेंनी सभेपूर्वी तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना शिंदेंनी ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिमगा मेळावा ठरेल, असा घणाघात केला. त्यामुळे आजच्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121