काफी डर का माहोल है! रवीश कुमारचा खोटेपणाचा बुरखा फाटला!
11-Oct-2023
Total Views | 806
मुंबई : हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत हजारो इस्त्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत इस्त्रायला पाठिंबा दिला आहे. पण भारतातील काही कट्टरपंथी मानसिकतेच्या लोकांनी इस्लामिक दहशतवादी संघटना असलेल्या हमासचे उघडपणे समर्थन केले आहे.
या समर्थनात कट्टरपंथीयांचाच समावेश नाही. तर भारतातील काही तथाकथीत बुद्धीजीवी आणि पत्रकार सुद्धा हमासच्या हल्ल्याचे उघडपणे समर्थन करत आहेत. यातच काल काँग्रेस पक्षाने सुद्धा आपल्या कार्यकारणीमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनात ठराव मंजुर केला.
For two days Ravish Kumar was silent.
Today Congress passes resolution supporting Palestine.
Now he has come up with the video supporting Palestinian terrorists.
काँग्रेस पक्षाने पॅलेस्टाईनच्या समर्थनात ठराव मंजुर करताच एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे माजी पत्रकार रवीश कुमार यांनी सुद्धा हमासच्या समर्थनात एक व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया चॅनलवर अपलोड केला. रवीश कुमार यांनी इस्त्रायलवर हल्ला झाल्यानंतर २ दिवसांनी हा व्हिडिओ बनवला.
या व्हिडिओ शेयर करण्याची वेळ पण खुपच महत्वपूर्ण आहे. काँग्रेसने पॅलेस्टाईनचे समर्थन करताच, रवीश कुमारांनी हा व्हिडिओ बनवला. त्यामुळे सोशल मिडियावर रवीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे अनाधिकृत प्रवक्ते असल्याची टीका करण्यात आली.
रवीश कुमार कायम काँग्रेसच्या समर्थनात भूमिका घेत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कायमच काँग्रेसचा प्रवक्ता असल्याची टीका होत असते. आताही रवीश कुमार यांनी इस्त्रायलच्या मुद्द्यावर काँग्रेसच्याच भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांना आणखी बळ मिळत आहे.