आदित्य ठाकरेंना मोठा दणका! शिंदेंनी केली मोठी खेळी!

वरळीतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात पक्षप्रवेश

    30-Jan-2023
Total Views | 178
 
Aditya Thackeray
 
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे - (Image Credit - Aditya Thackertay Twitter)


मुंबई :
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची यावरून सुरु झालेला वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या समोर आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरेंना सातत्याने जोरदार धक्के दिले जात आहेत. माजी मंत्री आदित्य उद्धव ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नगरसेवक संतोष खरात यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश ठाकरेंना मोठा धक्का समजला जात आहे.



येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मार्फत मुंबईत पक्षबांधणी आणि ठाकरे गटावर कुरघोडी करण्याच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी मतदारसंघावर शिंदे गटाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.


वरळी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९५ मध्ये २०१७ साली महापालिकेची निवडणूक जिंकलेले शिवसेना नगरसेवक संतोष खरात यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य यांच्या मतदारसंघातील पहिला नगरसेवक फोडण्यात शिंदे गटाला यश आले असून येत्या काळात आणखी काही नगरसेवक आणि मोठे पदाधिकारी आमच्यात सहभागी होतील, असा विश्वास शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.



आमदार आणि खासदारांच्या जंत्रीनंतर मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हा केवळ ठाकरे गटच नाही तर मुखत्वे आदित्य ठाकरेंना जबरदस्त हादरा समजला जात आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121