आदी शंकराचार्यांच्या जन्मस्थळी पंतप्रधान करणार वेदपाठशाळेचे उद्घाटन!

    01-Sep-2022
Total Views | 62
 
shankaracharya
 
 
 
त्रिवेंद्रम : आदी शंकराचार्यांचे जन्मस्थळ असलेल्या कलाडी येथे पंतप्रधानांच्या हस्ते वेदपाठशाळेचे उद्घाटन होणार आहे. ९० वर्षांहून अधिक जुन्या या वास्तूचा जीर्णोद्धार होणार आहे. गुरुवार १ सप्टेंबरला हा सोहळा संपन्न होणार आहे. इसवी सन आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केले. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य भारतीय इतिहासात अजोड असेच आहे. त्याचा उचित सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते होतो आहे.
 
 
 
 
 
 
 
कलाडी हे शंकराचार्यांचे जन्मस्थान. अत्यंत धार्मिक आणि श्रद्धाळू आईवडिलांच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांच्या त्या गावात अजूनही त्यांच्या आईचे श्रद्धास्थान असलेले मंदिर अस्तित्वात आहे. गावाजवळून शंकराचार्यांच्या प्रार्थनेने त्यांना भेटायला आलेली पेरियार नदी वाहते. आदी शंकराचार्यांचे वडील याच गावातील कात्यायनी मंदिरात पुजारी होते. मौजीबंधनानंतर याच गावातून आदी शंकराचार्य ज्ञानप्राप्तीसाठी काशीला जायला निघाले आणि तिथे ज्ञानप्राप्तीनंतर संपूर्ण देशभर त्यांनी त्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार- प्रसार केला.
 
  
१९१० मध्ये विस्मृतीत गेलेल्या शंकराचार्यांच्या जन्मभूमीचा शोध, शृंगेरीपीठाचे ३३वे आचार्य सच्चिदानंद शिवभिवामा नरसिंह भारती यांनी आणि त्रावणकोरचे महाराज मूलम थिरुन्नाल रामा वर्मा यांनी घेतला आणि ती जन्मभूमी पुन्हा जगासमोर आणली. याच ठिकाणी १९२७ साली चंद्रशेखर भारती यांनी वेदपाठशाळेची स्थापना केली होती. आदी शंकराचार्यांचे कार्य फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला माहित व्हावे यासाठी पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. याचसाठी शंकराचार्यांचे समाधीस्थळ असलेल्या केदारनाथ येथे त्यांच्या १०८ फुटी पुतळ्याचे लवकरच अनावरण केले होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121