मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत, भ्रष्टाचारी नेत्यांना गजाआड करण्याचे सत्र सुरु झाले असतानाच एक नवीनच माहिती समोर आली आहे. १९२६ साली उभारण्यात आलेल्या आर्थर रोड जेलमध्ये नवीन ९ व्हीआयपी बराक तयार करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीचे स्वयंघोषित विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचा नंबर लागला. आता या नव्या बराक कुठल्या नेत्यांसाठी आहेत?, आता कुठल्या नवीन नेत्याचा नंबर लागणार? या व्हीआयपी बराकचा नवीन पाहून कोण? हे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
या नवीन बराक अत्यंत अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे आहेत. ग्राऊंड प्लस वन अशी रचना असलेल्या पंख, टीव्ही सेट, गादी, उशी यांसारख्या सर्वच सुविधा पुरवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व बराक इतर तुरुंगापासून वेगळे आहेत, त्यामुळे या बराक मधील कैदी सर्वसामान्य कैदी नसणार हे तर उघड आहे. याच बराक मध्ये नीरव मोदी आणि विजय मल्या यांना दोघा कुख्यात बँक घोटाळेबाजांना ठेवण्याचा प्रस्ताव होता पण त्या दोघांचेही हस्तांतरण अजूनही न झाल्याने ते लांबणीवर पडले आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत चढाओढ लागलेली दिसते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर मंत्र्यांनंतर शिवसेनेचे बोलघेवडे प्रवक्ते गजाआड गेले. आता शिवसेनेचेच अनिल परब रांगेत आहेत. संजय राऊत हे जेलमध्ये आपल्या न्याय्य हक्कांची पूर्तता होत नाही अधिकंग ओरड सातत्याने करत असतात, आता या नव्या बाराक त्यांचे हक्क नक्की पूर्ण करतील अशी आशा आहे. अजून ६ बराक रिकामे आहेत त्यामुळे अजून कुठले सहा व्हीआयपी नेते या बराकचे रहिवासी होणार? या कडे आता सर्वांचेच लक्ष आहे.