डोंबिवलीतील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे निधन

    29-May-2025
Total Views |
डोंबिवलीतील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे निधन


डोंबिवली, डोंबिवली येथील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ वास्तुविशारद जयंत फाटक, मुलगी लीना गद्रे, जावई राजन गद्रे असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यापासून त्या आजारामुळे अंथरूणाला खिळून होत्या. 1988 पासून फाटक सर्वेश सभागृहाच्या कारभार पाहत होत्या. मनमिळावू, मदतीसाठी नेहमीच हात पुढे करणाऱ्या फाटक सीता वल्लभ सामाजिक संस्था चालवित होत्या. या संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षात गोरगरीब, गरजूंना आर्थिक मदत केली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून साहाय्य केले.