उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये बांधकामाधीन पूल कोसळला; अनेक अडकल्याची भीती

    20-Jul-2022
Total Views | 64
 UT
 
 
 
 

रुद्रप्रयाग: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात बुधवारी दि. २० रोजी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील नारकोटाजवळ बांधकामाधीन असलेला हा पूल कोसळला. या घटनेत ६ मजूर जखमी झाले आहेत, तर ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे.
स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड (एसडीआरएफ) आणि पोलिसांचे पथक बचाव कार्य करत आहेत. तब्बल सहा जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे, तर किमान पाच जण अजूनही अडकल्याची भीती एसडीआरएफच्या पथकाने व्यक्त केली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121