परवाच राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांनी नुपूर शर्मा या निलंबित भाजप प्रवक्तीचे स्टेटस ठेवले, म्हणून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका बाजूने हिंदूंचा बुद्धिभेद करत त्यांच्या नकळत त्यांना पथभ्रष्ट करायचे, दुसरीकडे दहशत पसरवीत राहायचं, तिसरीकडे माध्यमातून भ्रम पसरविण्याच उद्योग करायचा, तर चौथ्या बाजूने तथाकथित विचारवंतांनी अतिरेकी उदारता फक्त हिंदूंनाच सांगायची, असे हे षड्यंत्र आहे. या सगळ्या प्रकारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आज पुरून उरले आहेत.
दि. २४ जून रोजी भारताच्या सर्वोच्चन्यायालयाने गुजरात दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या ‘एसआयटी’चा अहवाल हा निर्दोषठरवत, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा गुजरात दंगलीशी काहीही संबंध नव्हता, यावर शिक्कामोर्तब केले जाकिया जाफरी यांच्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपल्या दोन पानी निकाल पत्रात काही तथाकथित समाजसेवक तसेच काही अधिकारी या सर्व प्रकरणाला चुकीची दिशा देत होते, असं म्हटलं आहे. 2002 मध्ये गोध्रा जळीतकांडावर सामान्य हिंदू नागरिकांची उठलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे गुजरात दंगली. या संपूर्ण प्रकरणात गोध्रा जळीतकांड या मुस्लीम जमावाने नियोजनपूर्वक रचलेल्या षड्यंत्राकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी नंतरच्या दंगली विकृत स्वरूपात रंगवल्या गेल्या.
हा खरंतर संपूर्ण हिंदू समाजाविरूद्ध या प्रकारची कारस्थाने इतर समाजाकडून सातत्याने रचली जात होती आणि आहेत आणि हिंदू समाज मात्र आपल्याच धर्मातील गुणवत्तेमुळे म्हणा किंवा भारत देशातील नैसर्गिक जीवन, सुलभता आणि सुबत्ता यामुळेअसेल, पण अशा सर्व गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होता. हा सगळाच प्रकार खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या आधीपासूनच सुरू होता. पण, हिंदू समाजाच्या या सगळ्या गोष्टींकडे पाहाण्याच्या ढिसाळ दृष्टिकोनामुळे या कटकारस्थान्यांचे चांगलेच फावत होते. हिंदू समाजाचा सर्वसमावेशक आणि उदारमतवादी दृष्टिकोन या अशा बाबतीत प्रचंड हानिकारक ठरतो, असेच म्हणावे लागते. हिंदू समाजाच्या या मानसिकतेची इंग्रजी राज्यकर्त्यांना जाणीव होती. त्यामुळे मग आमची मूळ शिक्षण पद्धती बदलून टाकत त्यांनी आमच्या मनात एक न्यूनगंड निर्माण केला.

राजकीय सूत्रेदेखील नेहरूंसारख्या स्वतःला ’अपघाताने हिंदू’ समजणार्या, कोणताही हिंदू धर्माभिमान नसलेल्या माणसाकडे जातील, हेच पाहिले असावे. लॉर्ड माऊंटबॅटन आणि लेडी माऊंटबॅटन यांची नेमणूकच मुळी नेहरू आणि एडविना यांचे संबंध लक्षात घेऊनच, धूर्तपणे केली होती. तसेच अव्यवहार्य अहिंसेचे गोडवे गात, खंडीत स्वातंत्र्य आमच्या माथी मारले गेले. नेहरूंना स्वतंत्र प्रज्ञेची आणि अस्सल भारतीय बाणा असलेली माणसं जणू चालतं नव्हती. परिणामी, स्वतंत्र प्रज्ञेच्या हिंदू धर्माभिमानी अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्या माणसांना राज्य प्रशासनात कोणतेही स्थान ठेवले गेले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाट्याला दुर्लक्ष आणि दुर्दैवच येईल, याची काळजी घेत अनेक अफवा आणि समज पसरवले गेले. भारतीय पत्रकारांचा, नेतृत्वाने फेकलेल्या चार तुकड्यांवर भुलणारा ’चाय बिस्कुट वर्ग’ यात नेहमीच पुढे येत असे. शिक्षणमंत्री म्हणून शक्यतो मुस्लीम व्यक्तीचीच निवड केली गेली. त्यात भर म्हणून 1970 नंतर सर्व महत्त्वाच्या शैक्षणिक आस्थापना साम्यवाद्यांना आंदण देण्यात आल्या. हिंदुत्ववादीआणि राष्ट्रवादी व्यक्तींना कुठेही पुढे येता येणार नाही, अशी काळजी घेत, अत्यंत चुकीचे समज आणि विचारसरणी समाजात रूजवली गेली. राष्ट्रीय महापुरुषांची चरित्रे डागाळण्याचा उद्योग करणार्या लेखकांना सन्मानित करत खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार नाही, अशी व्यवस्था केली गेली.
उदाहरणार्थ, विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने नाना फडणवीस यांचे संपूर्ण चारित्र्य डागाळून, त्यांच्या खर्या कार्याची सामान्य माणसाला जाणीवही होऊ दिली गेली नाही. शालेय अभ्यासक्रमातूनदेखील भारतीय इतिहासपुरूष काढून टाकले गेले. फक्त मुघलांचा खोटा इतिहास मुलांना सांगितला गेला. याच एकत्रित कारस्थानाचा एक छोटा अध्याय म्हणजे 2002च्या गुजरात दंगलींच्या निमित्ताने नरेंद्र मोदींची नियोजनपूर्वकबदनामीची 20 वर्षे चालवण्यात आलेली मोहीम. आपल्या या कारस्थानांसाठी काही व्यक्ती आणि संस्था (एनजीओ) यांना निधीच्या स्वरूपात मदत करायची आणि त्या पैशांचा प्रमुख भाग याच देशात हिंदू धर्म, हिंदू समाज यांच्याविरोधात कारवाया करण्यासाठी वापरायचा, ही यांची कार्यपद्धती असते.
गुजरात दंगलीच्या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज जर तेजोहीन करायचा असेल, तर तेथील हिंदू विचारांच्या प्रशासनिक प्रमुखाला लक्ष्य केले पाहिजे, त्याला दोषी ठरवत, मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याचे हे कारस्थान रचण्यात आले असे म्हणावे लागते. या सगळ्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर टिप्पणी केली आहे. काही ठरावीक सामाजिक संस्थांना बाहेरच्या देशातून सातत्याने पैसा पुरवला जातो. यात गमतीचा भाग म्हणजे या देशातील राज्य सरकारे हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनात नामनिर्देशित प्रतिनिधींच्या माध्यमातून ढवळाढवळ करू लागली, तर त्याचवेळी ख्रिश्चन चर्च किंवा मशिदींच्या व्यवस्थापनात मात्र प्रतिनिधी देण्याची कायद्यातच तरतूद केली गेली नाही. मुस्लिमांसाठी स्वतंत्र ‘वक्फ बोर्ड’ अस्तित्वात आले. या काळात हिंदू मतांचे धु्रवीकरण होऊ नये, म्हणून संपूर्ण मीडिया झटत असल्याचे दिसून आले. खोट्या बातम्या पसरवणार्या लोकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होते.
राम मंदिराचा लढा कायद्याच्या कक्षेत नेत लोंबकळत ठेवणे हादेखील याच कारस्थानाचा भाग होय. या काळात ’मंदिर वही बनायेंगे’, म्हणणार्या हिंदू समाजाला ’तारीख नही बतायेंगे’ म्हणून हिणवले गेले. त्या संपूर्ण समाजाचा मानभंग करण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. तेवढंच नाही, तर प्रभू राम हे कधी वास्तवात अस्तित्वात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. ‘हिंदू दहशतवाद’ हा अस्तित्वात नसलेला शब्द मीडिया आणि समाजमाध्यमांमधून पेरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांना आणि पर्यायाने संपूर्ण हिंदू समाजाला, जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. असे अनेक प्रकार, सरकारी आशीर्वादाने, या हिंदूबहुल देशात स्वातंत्र मिळाल्यापासूनसतत घडवून आणले जात होते. दहशतवाद्यांच्या फाशीवर पुनर्विचार करावा म्हणून फाशीच्या अंमलबजावणीच्या मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडणे भाग पाडले जात होते. संपूर्ण बॉलीवूड दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नव्हते.
हिंदू मंदिरे आणि त्यांचे पुजारी यांच्या प्रतिमा विकृत स्वरूपातच सादर केल्या जात होत्या आणि कही खूप गोष्टी हिंदू समाज आणि हिंदू धर्माच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे घडवल्या जात होत्या आणि या सगळ्या गोष्टींना काँग्रेसी सरकारांचा उघड पाठिंबा होता आणि असतो, असेच म्हणावे लागते. त्याच वेळी हिंदू समाज मात्र निश्चिंतपणे झोपी गेलेला होता. वैयक्तिक आणि कौटुंबिक योगक्षेमाच्या मागे लागलेला हिंदू समाज, या अवतीभवती घडणार्या घटनांकडे दृष्टिहिन होऊन पाहात होता. किंबहुना, आजही पाहात आहे. परवाच राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांनी नुपूर शर्मा या निलंबित भाजप प्रवक्तीचे स्टेटस ठेवले, म्हणून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका बाजूने हिंदूंचा बुद्धिभेद करत त्यांच्या नकळत त्यांना पथभ्रष्ट करायचे, दुसरीकडे दहशत पसरवीत राहायचं, तिसरीकडे माध्यमातून भ्रम पसरविण्याच उद्योग करायचा, तर चौथ्या बाजूने तथाकथित विचारवंतांनी अतिरेकी उदारता फक्त हिंदूंनाच सांगायची, असे हे षड्यंत्र आहे. या सगळ्या प्रकारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आज पुरून उरले आहेत. तेव्हा आता संपूर्ण हिंदू समाजाने सर्व हिंदू लढवैय्यांना कृतिशील पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे, हे समस्त हिंदू समाजाने लक्षात घ्यावे.
9881242224