'व्हर्च्युअली वाईल्ड' या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण

राणीच्या बागेतली रंजक आभासी सफर

    23-May-2022
Total Views | 54
AS
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): बृहन्मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्च्युअली वाईल्ड' या आभासी सफरीच्या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे ह्यांच्या हस्ते सोमवारी दि. २३ रोजी करण्यात आले. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील ‘सेल्फी पॉईंट’चेही लोकार्पण करण्यात आले.
 
 
मुंबई प्राणिसंग्रहालयात नवीन आणलेले नर अस्वल ‘शिवा’ याला देखील प्रदर्शनीमध्ये यावेळी सोडण्यात आले. या वर्षी दि. १८ नोव्हेंबर रोजी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दि.२३ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121