युद्ध आणि त्यातून भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्याच्या कहाण्या सर्वांना प्रेरणादायी असतात. 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाला गेल्या वर्षी 50 वषेर्र् पूर्ण झाली. 13 दिवसांच्या त्या युद्धात अनेक चढउतार होते, अनेक लढाया होत्या. त्यातल्या दारुचियानच्या युद्धावरच मेजर जनरल विजय सिंग यांनी लिहिलेलं ‘झजथ 1971 "POW 1971 a Soldier's Account of the Heroic Battle of Daruchhian' सर्वात उल्लेखनीय पुस्तक लिहिले आहे. विशेष म्हणजे, मेजर जनरल विजय सिंग हे चौथ्या पिढीतील अधिकारी सध्या लष्करात सेवा बजावत आहेत आणि या पुस्तकातील नायक त्यांचे वडील मेजर (नंतर ब्रिगेडियर) हामिर सिंग हे होत!
हे पुस्तक लिहिण्याआधी विजय यांना वडिलांनी हे पुस्तक लिहिण्याची परवानगी या अटीवर दिली होती की, या पुस्तकाची रक्कम लढाईतील हुतात्म्यांच्या नातेवाईकांच्या देखभालीसाठी वापरली जाईल. मागे वळून पाहताना बहुतेक लोकांना आश्चर्य वाटेल की, बटालियनने युद्धविराम रेषेवर हा सर्वात कठीण हल्ला कसा केला असेल. चार भागांमध्ये लिहिलेले आहे, म्हणजे दारुचियान टॉपची लढाई, रावळपिंडी येथील इस्पितळात घालवलेला काळ, लायलपूरच्या ‘पीओडब्ल्यू’ कॅम्पमधील काळ आणि शेवटी घरी परततानाच्या भावना... प्रत्येक प्रकरण आश्चर्यकारकपणे वर्णन केले आहे आणि भूतकाळातील विविध आठवणींशी जोडलेले आहे.
दुसर्या भागात हामिर यांना पाकिस्तानच्या लष्कराने पकडल्यानंतर पाकिस्तानी लष्करी रुग्णालयात दुखापतीतून बरे होण्यासाठी घालवलेल्या वेळेचं तपशीलवार वर्णन आहे. कमांडो असल्याची भीती वाटल्याने सुरुवातीला हामिर यांना एकाकी ठेवण्यात आले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली गेली. तथापि, हिंदू सैनिकाची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जिज्ञासू लोक एकमात्र खिडकीतून डोकावत होते आणि त्यांना प्राणीसंग्रहालयातील पिंजर्यात अडकलेल्या प्राण्यासारखे वाटले.
लायलपूर तुरुंगातील त्यांचा काळ अतिशय तपशीलवार कव्हर करण्यात आला आहे. तथापि, धर्मांधतेने उपजत हिंदू द्वेष करणार्या पाकिस्तानी लष्कराचे अनेक विखारी प्रयोग हामिर यांनी हाणून पाडले. हामिर खैम खानी मुस्लीम कंपनीचे नेतृत्व करत असल्याने भारतीय सैन्याच्या रीतीरिवाजांनुसार शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी ते सैनिकांच्याबरोबर नमाजचे पठण करत असत. याचे पाकिस्तानी लोकांना आश्चर्य वाटले. शिबिरातील सर्वात वरिष्ठ भारतीय अधिकारी म्हणून त्यांचे नेतृत्वगुण दिसून आले आणि त्यांनी त्यांना खेळ खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आणि पकडलेल्या आपल्या उर्वरित जवानांना त्यांच्या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली.
दारुचियानच्या उत्तरावर ठरल्याप्रमाणे गोष्टी घडून न आल्याने आपल्याला पकडले गेले याची हामिर यांना पूर्ण जाणीव होती. परंतु, त्यांनी आपल्या माणसांचे आणि सहकारी अधिकार्यांचे शौर्य पाहिले होते. त्यांचे जीवाभावाचे तीन मित्र जे इतर तुकड्यांचे नेतृत्व करत होते, त्यांनी या युद्धात सर्वोच बलिदान केलेले होते, याची आठवण हामिर यांना कायम आहे. दुर्दैवाने, मेजर चहल, हा हामिरचा जवळचा मित्र आणि महाविद्यालयीन वर्गमित्र, खाणीवर पाऊल ठेवून त्याचा पाय खराब झाला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दुसर्या धुरीवर असताना, मेजर डोग्रा शत्रूच्या मशीनगनच्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झाला होता आणि कंपनी आता तोफखान्यासह प्रखर गोळीबारात होती ज्यात त्याचा मृत्यू झाला. काही मिनिटांतच त्याचे सर्व प्रमुख कर्मचारी मारले गेले किंवा गंभीर जखमी झाले. युद्धावरचं प्रकरण वाचताना ते चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं आणि अंगावर काटा नक्कीच येतो.
डिसेंबरमध्ये जरी युद्ध संपले तरी हामिर यांच्याबद्दल काहीच बातमी न आल्याने हामिर यांच्या पत्नीवर कायमचा परिणाम झाला. ऐन विशीत असलेल्या या तरुण स्त्रीवर काय वेळ आली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यांनी तर हामिर मारले गेले आणि आपल्या नशिबी वैधव्य आलं असाच समज केला होता. 1972 मध्ये जेव्हा हामिर आणि त्यांच्या साथीदारांची सुटका करण्यात आली, तो प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा आहे. हामिर यांच्या प्रमाणेच अनेक कुटुंबांना त्यांच्या मुलांबद्दल, पतीबद्दल कोणतीच बातमी समजलेली नव्हती. जे परत आले नाहीत, त्यांच्या विधवा आणि पालकांना तोंड देण्यासाठी हामिर आणि इतरांना तयार राहावे लागले ते वाचताना कोणाचेही मन हालवून जाईल.
हामिर ‘नायजेरियन डिफेन्स अकादमी’मध्ये प्रतिनियुक्तीवर होते आणि उद्रेक होण्यापूर्वी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रजेवर भारतात आले होते. युद्ध जवळ आल्याने त्यांनी आपल्या बटालियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. हामिर यांचे वडील, मेजर जनरल कल्याण सिंग हेसुद्धा लष्करात होते आणि दुसर्या महायुद्धात कार्यरत असताना युद्धकैदी होते. नायजेरियन अकादमी की बटालियन, या पेचात सापडलेल्या हामिर यांना त्यांचा बटालियनमध्ये सामील होण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा वडिलांनी दिला आणि आपल्यात शूर योद्ध्याच्या मूल्यांनुसार सज्ज केले.
निःसंशयपणे ब्रिगेडियर हामिरसिंग यांच्या कुटुंबाचा एक मोठा वारसा आहे, मागे वळून पाहताना ते वाचले, हे भाग्यवान वाटत असले तरी त्यांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि त्यांनी कमांड केलेल्या माणसांचे शौर्य दिसून आले. त्यांच्या वीरचक्राचा दाखला सांगितल्याप्रमाणे त्याने शौर्य आणि दृढनिश्चय प्रदर्शित केले. नेतृत्व आणि चारित्र्य गुण जसे की, वचनबद्धता, योग्यता, धैर्य, लवचिकता, त्याच्या सैन्याबद्दल काळजी आणि कधीही न म्हणण्याची वृत्ती दिसून येते. निःस्वार्थ पराक्रमाची ही कहाणी भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहो आणि त्यांचा वारसा कायम राहो.
पुस्तकाचे नाव : "POW 1971 a Soldier's Account of the Heroic Battle of Daruchhian'
लेखक : मेजर जनरल विजय सिंग
प्रकाशन : स्पिकिंग टायगर
पृष्ठसंख्या : 251
- रोहन अंबिके