"बाळासाहेबांनी जी वचने दिली होती ती उद्याच्या सभेत जाहीर करावी" : गजानन काळे

    13-May-2022
Total Views | 56
 
cm
 
मुंबई : सध्या राज्यात भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे. अशातच आता "बाळासाहेबांनी जी वचने दिली होती ती उद्याच्या सभेत जाहीर करावी", असे आव्हान मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
 
"शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचेच फोटो पोस्टरवर लावून गर्दी जमा करावी लागते आहे. एवढंच नाही तर शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणातील दृश्य शिवसेनेला त्यांच्या टीझरमध्ये दाखवावे लागत आहे. माझं मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं माझं सरकार आला तर मी मशिदीवरचे भोंगे उतरविन, रस्त्यावरचा नमाज मी बंद करिन या हिंदुत्ववाच हुंकार देणारे जे पोस्टर सध्या सर्वत्र लागले आहेत त्याची घोषणा उद्याच्या सभेत त्यांनी करावी", असे जाही आव्हान काळे यांनी मुख्यामंत्र्यांना दिले आहे.
 
 
 
१४ मे रोजी शिवसेनेची सभा असून माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. १४ तारखेला अनेकांचे मास्क काढणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूर्वीच स्पष्ट केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121