
मुंबई : भाजप नेते विश्वास पाठक यांनी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोअड शेगिंगच्या समस्येवर भाष्य करत असताना, विजेची मागणी वाढत असल्याची कारण दिली. यावर टीपण्णी करताना विश्वास पाठक यांनी ट्विट करत 'ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य म्हणजेच त्यांचे अपयश लपविण्याचे प्रयत्न आहेत' असा घणाघात केला आहे.
विश्वास पाठक यांनी या विषयाला धरून एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटटर अकाउंट वरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांनी उर्जा मंत्र्यांचा समाचार घेतला. 'दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची मागणी वाढतेच यात नविन काहीच नाही, परंतू ही मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन लागते, गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पाठवलेल्या पत्रात कोळश्याचा साठा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्घवली असल्याची' टीका यावेळी विश्वास पाठक यांनी केली आहे. सोबतचं 'सरकारला विजेचे नियोजन करताच येत नाही, त्यामुळे ही समस्या हे उर्जा मंत्र्यांचे अपयश असल्याचा' आरोपही यावेळी विश्वास पाठक यांनी केला.