शिवसैनिक सांगतील त्यादिवशी "मातोश्री"वर येऊन हनुमान चालीसा पठण करू

शिवसैनिकांच्या आव्हानाला खासदार नवनीत राणा यांचे प्रत्युत्तर

    16-Apr-2022
Total Views | 119
 
 
navneet rana
 
 
मुंबई : रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनी आपण मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर शनिवारी सकाळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी करत शिवसैनिकांनी राणा रवी राणा व नवनीत राणा यांना तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा असे आव्हान दिले होते. त्यानंतर "शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्यादिवशी 'मातोश्री'वर येऊन हनुमान चालिसेचं पठण करेन," अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शैवसैनिकांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, "मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठिशी आहे. याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे," असे देखील नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
शिवसैनिकांनी दिलेल्या आव्हानावर रवी राणा यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "मी आज हनुमानाची पूजा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. उद्धव ठाकरे हे दिशाहीन झाले असून त्यांच्यामुळे राज्याला साडेसाती लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी माझ्याविरोधात आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावे. जेणेकरून राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होईल." तसेच, "माझ्यापाठी राम आणि हनुमानाचा आशीर्वाद असल्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास मला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे," असेदेखील रवी राणा यांनी म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121