नितेश राणेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब

दिशा सालीयन प्रकरणातील पुरावे सीबीआय आणि कोर्टासमोर मांडणार

    25-Mar-2022
Total Views | 251

disha saliyan
 
 
 
मुंबई: दिशा सालीयन प्रकरणातील सर्व पुरावे आमच्याकडे असून आम्ही ते पुरावे फक्त सीबीआय आणि न्यायालयाला देणार असे म्हणत आ नितेश राणेंनी विधानसभेत पुरावे असणारा पेन ड्राइव्ह विधानसभेतील प्रस्ताव सादर करताना दाखवला. मात्र हे पुरावे आम्ही सभागृहात किंवा गृहमंत्र्यांकडे देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार नितेश राणे यांनी यावेळी मांडली. त्यामुळे आता नितेश राणेंच्या या पेन ड्राइव्ह बॉम्बचे नवे पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळू शकतात. नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी दिशा सालीयनच्या प्रकरणावर स. राणे साहेब केंद्रीय मंत्री आणि आम्ही पत्रकार परिषदेतून काही आरोप केले. त्यांनंतर आमच्यावर केस दाखल केली. दिशा सलीयनच्या आई वडिलांनी केस दाखल केली असं सांगण्यात आलं. महिला आयोगाकडे ती केस गेली. २४ तासात कारवाई झाली. इतकी तात्काळ कारवाई महिला आयोग कधीही करताना दिसत नाही. पण २४ तासात ही केस घेतली गेली आणि आमच्यवर गुन्हे दाखल केले गेले.
 
 
असे कलम टाकले जे गुन्हे आम्ही केलेच नाहीत. त्याही पुढे जाऊन जेव्हा आम्ही चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकात गेलो. तेव्हा वळसे पाटील साहेब आमची ९ तास चौकशी केली. एक केंद्रीय मंत्री एक आमदार आणि ९ तास समोर डिसीपी, आयओ बसले आहेत. एफ आय आर समोर असूनही एकही प्रश्न एफआयआर संबंधित विचारण्यात आला नाही. आम्ही वारंवार विचारत होतो की, तुमचं नेमकं इंटेशन काय आहे? पण नाही तुमच्याकडे दिशा सालीयनचा फोटोग्राफ कोणता आहे पार्टीतील? तुम्हाला फोन कोण करत? रोहन रॉयबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली? प्रश्नांनंतर १५ १५ मिनिटांनी डिसीपीना फोन येत होते. बाहेर जायचे फोन घ्यायचे आणि परत येऊन चौकशी करायचे.९ तास हेच सुरू होतं.
 
 
राज्यात शक्ती कायदा तुम्ही आणत आहात. तो कायदा दिशा होता त्याचं नाव शक्ती का ते आता कळलं. दिशा सालीयनची खरंच आत्महत्या तर तिच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? तिच्या इमारतीतील वॉचमनला का गायब करण्यात आलं? व्हिजिटर बुकच्या ८ आणि ९ तारखेचे पान गायब ? तिच्यासोबत राहणारा तिचा मंगेतर जो आय विटनेस आहे तो आजपर्यंत कुठे आहे. मी जबाबदारीने सांगतोय की दिशा सालीयन ची आत्महत्या नाही हत्या आहे.
 
 
आज मी सभागृहात पुरावे आणले आहेत. मी हे पुरावे त्यादिवशी पोलिसांना दिले असते. पण नाही देणार कारण मुबंई पोलिसांच्या तपासावरच आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. मुंबई पोलिसांनी तपास कोणाला वाचविण्यासाठी केला आहे त्या मुलीला न्याय देण्यासाठी केलेला नाही. आता पेन ड्राईव्ह चा जमाना आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस युनिव्हर्सिटी ऑफ पेन ड्राइव्हचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे शिष्याने एक पेन ड्राइव्ह तरी काढला पाहिजे. म्हणून मुद्दाम एक पेन ड्राइव्ह करून आणला आहे. संवादाचा पेन ड्राइव्ह आहे. यात एक मंत्री दिशा सालीयन च्या हत्येत आणि बलात्काराच्या शामिल आहे हे एक आय व्हिटनेस मला आणि अमित साटमना सांगतो आहे. याची स्क्रिप्ट ही तयार केली आहे.
 
 
पण हा पेन ड्राइव्ह किंवा स्क्रिप्ट मी सभागृहात देणार नाही किंवा गृहमंत्र्यांना देणार नाही. हे पुरावे मी न्यायालयाला आणि सीबीआयला देईल. कारण माझी इच्छा आहे की त्या मुलीला न्याय मिळावा. नाहीतर यामध्ये महिती देणारा तरुण जिवंत राहील का याची कोणतीही शाश्वती मला नाही. पण पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही हे सिद्ध करू शकतो की ८ तारखेच्या दिशा सलीयनच्या प्रकरणात महाराष्ट्रचा एक मंत्री होता हे आम्ही सिद्ध करू शकतो. ही आत्महत्या नसून हत्या आहे यात एक मंत्री शामिल आहे. सुशांतसिंग ची देखील आत्महत्या नाही हत्याच आहे याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. हे पुरावे येणाऱ्या काळात आम्ही सीबीआयला देऊ. दिशा सलीयनचा पोस्ट मोर्टम रिपोर्टही माझ्याकडे आहे. हीच माहिती काढण्याचे प्रयत्न ९ तासाच्या चौकशीत होत होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121