राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची चौकशी होणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

    01-Dec-2022
Total Views | 53

उदय सामंत
 
 
 
 
 
 
मुंबई : “माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्योग प्रश्नावरून केवळ राजकीय आरोप करत असून त्यांच्या पत्रकार परिषदा निव्वळ राजकीय आहेत. ‘वेदांता’-‘फॉक्सकॉन’प्रकल्पावरून देखील महाविकास आघाडीने (मविआ) केवळ आरोप केले, त्यात कुठेही तथ्याचा लवलेशही नव्हता.
 
 
 
‘वेदांता’ असेल किंवा इतर उद्योग फडणवीस-शिंदे सरकारच्या काळात राज्याबाहेर जात असल्याचा आरोप ठाकरेंकडून केला जात आहे. त्यामुळे यातील वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या समितीकडून राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची चौकशी करण्यात येणार आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. बुधवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मविआकडून केले जाणारे आरोप, आदित्य ठाकरेंनी केलेली विधाने आणि राज्यात नव्याने येत असलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीवर भाष्य केले.
 
 
 
 
सत्ता गेल्यावर कशी चिडचिड होते, ते आदित्य ठाकरेंच्या टीकेतून स्पष्टपणे निर्देशित होते आहे. परंतु, औद्योगिक क्षेत्राचा विचार करता राजकीय वादामुळे आणि टीकाटिप्पणीमुळे त्याचा उद्योगांवर परिणाम होऊ नये,” अशी आमची अपेक्षा असल्याचेही सामंत यांनी नमूद केले आहे.
 
 
सत्याच्या उलगड्यासाठी श्वेतपत्रिका
 
 
 
 
“महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, अशी ओरड करणार्‍यांना उत्तर देण्यासाठी आणि त्यातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती किमान 30 ते कमाल 60 दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून सत्य काय, ते महाराष्ट्रासमोर ठेवणार आहे. आम्ही याबाबत श्वेतपत्रिकादेखील काढण्याचे आदेश दिलेले असून लवकरच ती श्वेतपत्रिका देखील राज्याच्या जनतेसमोर ठेवली जाणार आहे. चौकशी समिती आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या आरोपांमधील तथ्य आणि वास्तव काय ते समोर येणार आहे,” असे म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीला थेट इशाराच दिला आहे.
 
लवकरच 50 हजार कोटींचे शाश्वत उद्योग येणार
 
 
 
सामंत म्हणाले की, “मागील तीन महिन्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण उद्योजकांना महाराष्ट्रात घेऊन येण्यात सरकारला यश आले आहे. नुकताच 20 हजार कोटींचा ‘किनार मास प्रकल्पा’चा राज्यातील मार्ग खुला झाला असून त्याचे भूसंपादन आणि इतर आवश्यक बाबी आमच्याच सरकारच्या काळात होत आहेत. जर्मन इंडस्ट्रीलादेखील त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करायचा असून त्यांच्या कंपन्यांचे विस्तारीकरण महाराष्ट्रात होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
 
 
 
आजच्या घडीला महाराष्ट्रात होत असलेल्या औद्योगिक घडामोडी हाच राज्याचा शाश्वत विकास आहे. याचप्रमाणे येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात अंदाजे 40 ते 50 हजार कोटींचे प्रकल्प येणार असून त्यातून राज्याचा शाश्वत विकास झाल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही सामंतांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121