डोंबिवली : राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचाराचे सत्र थांबता थांबेनासे झाले आहे. डोंबिवलीत एका १५ वर्षीय मुलीवर ३० जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आत्तापर्यंत २६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात एकूण ३० आरोपींची नावे बलात्कार पीडितेने दिली आहेत. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने बलात्कार करत असताना व्हीडिओ तयार करून धमकी देत असल्याचेही मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.