मुंबईतील कांदळवनामध्ये २ हजार हे. क्षेत्राची भर होणार: ठाणे खाडी 'रामसर'साठी प्रस्तावित

    26-Jul-2021   
Total Views | 327
mangrove _1  H


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास १ हजार ९१९ हेक्टर कांदळवन आच्छादित क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात येणार आहे. 'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ' (सिडको), 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (एमएमआरडीए) आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या ताब्यातील हे क्षेत्र आहे. तसेच वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने 'ठाणे खाडी'ला आंतरराष्ट्रीय 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
 
 
 
सोमवारी 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिना'निमित्त 'माझी वसुंधरा' उपक्रमाच्या अंतर्गत एका टाऊनहाॅलचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये वन आणि पर्यावरण विभागातील अधिकारी, पर्यावादी कार्यकर्ते आणि संशोधकांनी राज्यातील पाणथळ आणि कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी वन विभागातील कांदळवन क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्याची माहिती दिली. 'एमएमआरडीए'कडून मुंबई उपनगरातील ३०० हेक्टर आणि सिडकोकडून कोमोठे आणि पनवेलमधील २१९ हेक्टर कांदळवन आच्छादित क्षेत्र 'वन कायद्या'अंतर्गत संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच वसई-विरार महानगर पालिकेने त्यांच्या अखत्यारितील जवळपास १,४०० हेक्टर कांदळवन क्षेत्र हे वन कायद्याअंतर्गत संरक्षित करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे तिवारी म्हणाले.
 
 
 
 
याखेरीच ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या मालकीचे एकूण १ हजार २४८ हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामध्ये मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील १,०३६ हे. क्षेत्र, ठाण्याच्या बाळकुममधील १२८ हे. आणि ठाणे हद्दीतील ८३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय ठाणे खाडी क्षेत्राला 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून मंजुरीनंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 'रामसर परिषदे'तर्फे पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी जगातील महत्त्वाच्या पाणथळ जागांना 'रामसर' स्थळाचा दर्जा देण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये नाशिकचे 'नांदूर मधमेश्वर अभयारण्य' आणि बुलढाण्यातील लोणार सरोवर या दोन पाणथळींना हा 'रामसर'चा दर्जा मिळाला आहे. ठाणे खाडीत फ्लेमिंगो अभायरण्य असून ते १६.९०५ चौ.किमी क्षेत्रावर पसलेले आहे.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121