नवी दिल्ली : भारतात दैनंदिन नव्या रुग्णसंख्येमध्ये घट होण्याचे प्रमाण कायम आहे. गेल्या २४ तासांत देशात ७0 हजार, ४२१ दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सातव्या दिवशी एक लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फलित आहे. भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सातत्याने घट होत आहे.
देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या आज ९ लाख, ७३ हजार, १५८ आहे. ६६ दिवसांनंतर भारतातली उपचाराधीन रुग्णसंख्या दहा लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णसंख्येत ५३ हजार, 00१ ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या ३.३0 टक्के आहेत. ‘कोविड-१९’ संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणार्यांची संख्या सलग ३२ व्या दिवशीही जास्त आहे. गेल्या २४ तासांत १ लाख, १९ हजार, ५0१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. गेल्या २४ तासांत दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, बरे होणार्यांची संख्या सुमारे ५0 हजारांनी अधिक होती. महामारीच्या सुरुवातीपासूनच्या कोरोनाबाधितांमधून २ कोटी, ८१ लाख, ६२ हजार, ९४७ लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या २४ तासांत १ लाख, १९ हजार, ५0१ रुग्ण बरे झाले.
रुग्ण बरे होण्याचा दर उंचावत असून हा दर ९५.४३ टक्के झाला आहे. देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून गेल्या २४ तासांत १४ लाख, ९२ हजार, १५२ चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत सुमारे ३८ कोटी चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्या वाढवत असतानाच साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर सध्या ४.५४ टक्के असून दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर आज ४.७२ टक्के आहे. सलग २१ व्या दिवशी हा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.