रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन आता भारतातही सुरू

    25-May-2021
Total Views | 101

sputinik v _1  



नवी दिल्ली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रशियाकडून तयार करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे उत्पादन आता भारतातही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. भारतात ‘पॅनासिया बायोटेक’ने ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन सुरु केले. ’रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड’च्या (आरडीआयएफ) मदतीने हे उत्पादन सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. ‘पॅनासिया बायोटेक’ ही कंपनी ‘स्पुटनिक-व्ही’चे वर्षाला दहा कोटी डोस तयार करणार आहे.
 
‘आरडीआयएफ’ आणि ‘पॅनासिया बायोटेक’कडून लसनिर्मितीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी करार करण्यात आला होता. त्या करारानुसार लसनिर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. ‘पॅनासिया बायोटेक’ कंपनीने हिमाचल प्रदेशातील आपल्या कारखान्यात ‘स्पुटनिक-व्ही’ लसीची निर्मिती सुरू केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लसींची पहिली मात्रा रशियाच्या केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता तपासली जाणार आहे.


‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’नंतर भारतात ’स्पुटनिक-व्ही’ लसीला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना लसींचा तुटवडा पाहता ‘स्पुटनिक-व्ही’ लसीला परवानगी देण्यात आली होती. केंद्र सरकारने दि. १२ एप्रिल रोजी या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर दि. १४ मेपासून या लसीचा डोस दिला जात आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121