रशियाच्या 'स्पुतनिक-वी' लसीला भारतात परवानगी!

    12-Apr-2021
Total Views | 134

sputinik v _1  




नवी दिल्ली
: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुरू असलेली वाढ पाहता एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोना लसीच्या तुटवड्याच्या मध्यावर आता 'स्पुतनिक-वी' या लसीला भारतात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत याबद्दल अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. रेड्डीज या कंपनीतर्फे ही लस बाजारात आणली जाऊ शकते. आपत्कालीन वापरासाठी ही लस भारतीयांसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशात ऑक्टोबर पर्यंत पाच कंपन्यांच्या लसी उपलब्ध होऊ शकतील, अशी शक्यता आहे.
 
 
विविध फार्मा कंपन्या लस तयार करत आहेत. सध्या या लसी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. वृत्तसंस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दहा दिवसांत केंद्र सरकार रशियाच्या 'स्पुतनिक-वी' या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देऊ शकते. देशाला कोवॅक्सिन, कोव्हीशिल्डनंतर तिसरी लस उपलब्ध होईल. राज्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीच्या तुटवड्याची टंचाईसुद्धा कमी होणार आहे.
 
 
देशात एकूण १० कोटी लोकांचे लसीकरण
 
 
देशाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत शनिवारी मोठी मजल मारली आहे. देशात कोरोनाच्या एकूण १० कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताने केवळ ८५ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला. अमेरिकेत ९.२ कोटी, चीनमध्ये ६.१४ कोटी लसीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांच्या तुलनेत भारताने हा मोठा पल्ला गाठला आहे. देशात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तुटवड्यामुळे हा वेग काहीसा मंदावला असला तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला. 'टीका उत्सव' लक्षात घेता भारत स्वतःचाच विक्रम लवकरच मोडेल, अशी अपेक्षा आहे. देशात एकूण १० कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार, केंद्र व राज्यांच्या तुलनेत सरकारतर्फे केलेल्या या उपक्रमामुळे जगात सर्वात कमी मृत्यूदर हा भारतात (१.२८ टक्के) आहे.
 
 
महाराष्ट्रात एक कोटी नागरिकांचे लसीकरण
 
 
महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीतील देशातील पहिले राज्य बनले आहे. एकट्या महाराष्ट्राने एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ कोटी ३८ हजारांचा टप्पा पार केला आहे. १६ जानेवारपासूनच कोरोना लसीकरण मोहिम सुरू झाली.
 
 
दिल्लीतील परिस्थिती बिकट
 
महाराष्ट्रात आता दिल्लीतही परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "पुढील १०-१२ दिवसांत कोरोना बऱ्याचवेळा पसरेल. ही कोरोनाची चौथी लाट आहे. २४ तासांत इथे १० हजार ७३२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे, आम्ही लॉकडाऊन लावण्याच्या मानसिकतेत नाही. मात्र, शनिवारी सरकारने मजबूरीमुळे काही ठिकाणी निर्बंध लावले आहेत. दिल्लीत एकूण ६५ टक्के रुग्ण ३५ वर्षांपैकी कमी आहेत. कोरोना थांबवायचा कसा हा प्रश्न आता समोर आहे. जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा ही परिस्थिती आटोक्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
२४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्ण
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात शनिवारी १ लाख ५२ हजार ५६५ कोरोना रुग्ण आढळले आहे. महामारीच्या सुरुवातीपासूनच एका दिवसांत इतक्या जास्त प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत ९० हजार ३२८ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी दिवसभरात ८३८ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी आठशेच्या वर पोहोचला आहे. यापूर्वी ८ एप्रिल रोजी ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
 
  
 
देशात एकूण १.३३ कोटी रुग्ण संक्रमित
 
देशात एकूण १ कोटी ३३ लाख ५५ हजारांहून रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यापैकी १ कोटी २० लाख ७८ हजार लोक बरे झाले आहेत. १ लाख ६९ हजार ३०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सक्रीय रुग्णांचा आकडा वारंवार वाढत आहे. देशात आता एकूण ११ लाख ३ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट वारंवार घसरत आहे. दोन दिवसांत हा ९१.७६ टक्क्यांवरून ९०.४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन आठवड्यात हा दर एकूण ८ टक्क्यांनी घसरला आहे, सर्वात कमी रिकव्हरी रेट हा छत्तीसगड ७९.१ टक्के, महाराष्ट्रात ८२.२ टक्के या राज्यांमध्ये सर्वात कमी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121