जगातील सर्वात सामर्थ्यवान लष्करात भारत देश चौथ्या क्रमांकावर

    22-Mar-2021
Total Views | 136

indian army rank_1 &



पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे चीन, अमेरिका व रशिया.



नवी दिल्ली :
‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाईटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वांत सामर्थ्यवान लष्करामध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे, तर भारतीय लष्कर या क्रमावारीत चौथ्या स्थानी आहे. मुख्य म्हणजे, लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ही ७४ गुणांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ गुणांनी तिसऱ्या स्थानी आहे आणि या यादीत फ्रान्सचे लष्कर ५८ गुणांनी पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाईटच्या अग्रणी दहा देशांच्या लष्करांत ब्रिटन ४३ गुणांनी नवव्या क्रमांकावर आहे. सदर अध्ययनात म्हटले आहे की, आर्थिक तरतूद, सक्रिय आणि असक्रिय सैनिकांची संख्या, हवाई, सागरी आणि भूप्रदेश आणि आण्विक संसाधन, सरासरी वेतन आणि उपकरणांची संख्या या घटकांनुसार ‘लष्करी सामर्थ्य निर्देशांक' तयार करण्यात आला आहे. या घटकांनुसार चीन १०० पैकी ८२ गुणांनी जगातील सर्वांत सामर्थ्यवान लष्कर अग्रणी आहे.

एकूण लष्करासाठी आर्थिक तरतूद, सैनिक, तसेच वायू आणि नौदलाच्या क्षमतेवर आधारित गुणांनुसार एखाद्या युद्धात चीन बाजी मारू शकते. या वेबसाईटनुसार जगभरात अमेरिका लष्करावर सर्वात अधिक ७३२ अब्ज डॉलर खर्च करतो. लष्करी खर्चाच्या दृष्टीने चीन दुसरा असून, चीन २६१ अब्ज डॉलर खर्च करतो, तर भारत लष्करावर ७१ अब्ज डॉलर खर्च करतो. एखाद्या सागरी युद्धात चीन विजयी होईल. हवाई युद्धात अमेरिका आणि जमिनी युद्धात रशिया  विजयी होईल.
  
त्याचप्रमाणे, हवाई युद्ध झाल्यास अमेरिका जिंकू शकते; कारण अमेरिकेकडे १४,१४१ लढाऊ विमाने आहेत. रशियाकडे ४,६८२ आणि चीनकडे ३,५८७ लढाऊ विमानांचा ताफा आहे. जमिनीवरील युद्धात रशिया बलवान आहे. कारण, रशियाकडे ५४,८६६ लष्करी वाहने आहेत, अमेरिकेकडे ५०,३२६ आणि चीनकडे ४१,६४१ लष्करी वाहनांचा ताफा आहे. सागरी युद्ध झाल्यास चीन वरचढ ठरू शकतो. कारण चीनकडे ४०६ लढाऊ जहाज आहेत. तुलनेत रशियाजवळ २७८, तर अमेरिका आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात २०२ लढाऊ जहाजे आहेत, असे या वेबसाईटने म्हटले आहे. 




अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले...

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121