‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या टिप्पणीवर दिलेली प्रतिक्रिया याचेच उदाहरण ठरेल.
Read More
(Donald Trump On India-Pakistan Conflict) भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळून जवळपास दोन महिने झाले असले तरी त्याबाबतच्या चर्चा मात्र अद्याप सुरूच आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार या संघर्षावर भाष्य करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत नवा दावा केला आहे. शुक्रवारी १८ जुलेला रात्री व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत डिनरच्यावेळी ट्रम्प यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान चार ते पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती
(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क
गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून चुकीचे वार्तांकन करण्यात येत आहे. त्याविरोधात भारतीय वैमानिक महासंघाने (एफपीआय) ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ या परदेशी प्रसारमाध्यमांना कायदेशीर नोटीस बजावली असून मृत वैमानिकांना दोष देणारे वृत्तांकन थांबवून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
उत्तर भारतीय मतदारांचे मुंबईच्या राजकारणातील वाढते वजन लक्षात घेता काँग्रेसने ‘मुंबई विरासत मिलन’ नावाच्या विशेष अभियानाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसपासून दुरावलेल्या या समाजाला पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उचललेले हे पाऊल केवळ मतांवर डोळा ठेवून आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
"महाकवी कालिदास यांच्या लिखाणामध्ये अलौकिक प्रतिभा डोकावते. कालिदासांच्या लेखणीतून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य उलगडते" असे प्रतिपादन प्राध्यापक मेधा सोमण यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आज भारतात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे, मेट्रो प्रकल्पांसाठी बोगद्यांतून जाणार्या मार्गांचा पर्याय अवलंबिला जातो. शहरांच्या उदरातून धावणार्या या बोगद्यांच्या उभारणीसाठीचे तंत्रज्ञान नेमके कोणते, याचा आढावा घेणारा लेख...
(AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपू
(MEA) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी १७ जुलैला अलिकडच्या काळात अमेरिकेत अटक झालेल्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणांवर भाष्य केले. यावेळी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना कडक सूचना देत स्थानिक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आणि परदेशात भारताच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. परदेशात भारतीयांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींच्या वाढत्या घटनांमुळे, परदेशात बेकायदेशीर वर्तनाचे परिणाम अधोरेखित होत असताना ही खबरदारी घेण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी भारतात आरेखन करून बांधलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आयएनएस निस्तार गुरुवारी भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली.
भारतात आरेखन करून बांधलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आयएनएस निस्तार शुक्रवारी भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली.
ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE/एआयबीई) देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी शुल्क सवलत योजना राबवण्याबाबत विचार करण्यास बार कौन्सिल ऑफ इंडियाला (बीसीआय) सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे. या परीक्षेसाठी सध्या ३५०० रुपये शुल्क आकारले जाण्याचा प्रस्ताव आहे, जे की अनेक गरिब विद्यार्थ्यासाठी परवडणारे नाही. ही बाब एका याचिकेद्वारे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि ए. एस. चांदुकर यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली होती.
भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात प्रगतीचे मोजमाप केवळ ‘जीडीपी’ अर्थात सकल देशांतर्गत उत्पन्नाची आकडेवारी किंवा पायाभूत सेवासुविधांनी गाठलेले टप्पे यावर अवलंबून नसते, तर एखादे राष्ट्र आपल्या लोकांचे पालनपोषण किती चांगल्या प्रकारे करते, यावर देखील अवलंबून असते. आपले शिक्षण, कौशल्य, आरोग्य, उत्पादकता या सर्वांनी मिळून तयार होणारे मानवी भांडवल ही केवळ आर्थिक संपत्ती नव्हे, तर नैतिक अनिवार्यता आहे. गेल्या दहा वर्षांत नीती आयोग या भारताच्या धोरणात्मक वैचारिक संस्थेच्या नेतृत्वाखाली एक मूक मात्र तरीही प्र
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या माजी कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनात केलेली एकतृतीयांश कपात ही नियमांचे उल्लंघन असल्याचे ठरवत, सर्वोच्च न्यायालयाने बँकेचा निर्णय रद्द केला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “पेन्शन हा केवळ नोकरदार वर्गाचा विवेकाधीन (मनमानी) निर्णयावर आधारित नसून, तो कर्मचाऱ्याचा संवैधानिक अधिकार आहे. जो कोणत्याही प्रक्रियात्मक न्यायाशिवाय किंवा कायद्याशिवाय नाकारता किंवा कमी करता येणार नाही.”
एका विभक्त दाम्पत्याला विवाहाच्या ‘अपूरणीय विघटन’ (Irretrievable breakdown of marriage) तत्व म्हणजे पती-पत्नीमधील संबंध इतके ताणले जातात की, ते पुन्हा एकत्र येणे शक्य नसते. या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “हा वैवाहिक संबध कायम ठेवण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. यामुळे पक्षांमध्ये केवळ वैर आणि मानसिक त्रास सुरू होईल, जे कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक सुसंवादाच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध
आज लढले जाणारे युद्ध हे उद्याच्या अर्थात नव्या तंत्रज्ञानाने लढण्याची गरज आहे, असे सांगून भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भारताने आपल्या संरक्षण क्षमतांचे आधुनिकीकरण करण्याची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
भारतीय लष्कराने स्वदेशी अत्याधुनिक ‘आकाश प्राइम’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची लडाखच्या १५,००० फूटांपेक्षा अधिक उंचीवर यशस्वी चाचणी पार पाडली आहे. लष्कराच्या हवाई संरक्षण दलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या समवेत ही चाचणी पार पाडली.
वनवासी समुदायाच्या आरोग्य सुधारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गुजरातने भारतातील पहिले वनवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची घोषणा वनवासी विकास मंत्री डॉ. कुबेर दिन्डोर यांनी गांधीनगर येथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चासत्रात केली.
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे रेल्वे पोहोचविण्याचे स्वप्न मोदी सरकारने प्रत्यक्षात आणले. असा हा ‘दुर्गमतेकडून उदयाकडे’चा प्रवास सर्वस्वी थक्क करणाराच!
गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी याबद्दलची माहिती दिली.
गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे भारतात आगमन झाले आहे. टेस्लाचा भारतातील पहिले दालन मुबंई येथे सुरू झाला असून, भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपली दमदार एण्ट्री केली आहे.
अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील भाष्य केल्याच्या प्रकरणी कॅामेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांना मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.जयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि त्याचा उपयोग इतरांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करण्यासाठी होऊ शकत नाही.”
भारताला सोमवारी एलसीए मार्क १ए लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून दुसरे जीई-४०४ इंजिन मिळाले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
एअर इंडिया अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर वैमानिकांना दोषी ठरवून ‘बोइंग’ची प्रतिमा वाचविण्यासाठी परदेशी प्रसारमाध्यमे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार करार चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार गती मिळत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेरील बंदी उठविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णायक आणि बहुआयामी रणनीतीमुळे देशातील नक्षलवादाचे कंबरडे मोडले असून, “नक्षलमुक्त भारत” हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. सुरक्षा कारवाया, पायाभूत विकास आणि स्थानिक सहभाग या तीन पायांवर उभारलेल्या धोरणामुळे नक्षलग्रस्त भागात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.
गोतस्करीच्या हेतूने भारतात अवैधरित्या शिरणारा शफीकुल इस्लाम ठार बांग्लादेश-भारत सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन घुसखोरांना सीमा सुरक्षा जवानांनी ठार मारल्याचे समोर येत आहे. गोतस्करीच्या हेतूने भारतात अवैधरित्या शिरणाऱ्या घुसखोरांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. भारतीय जवानांनी सर्वप्रथम त्यांना इशारादेखील दिला, मात्र तेव्हाच घुसखोरांनी दगडफेक करत जवानांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकील दोन घुसखोर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
पारंपारिक औषधांसह, विशेषतः आयुष प्रणालींसह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) एकत्रित करण्याच्या भारताच्या अग्रगण्य प्रयत्नांना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्यता दिली आहे. त्याचबरोबर आयुष मंत्रालयाच्या या आगळ्या वेगळ्या प्रकल्पासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून आयुष मंत्रालयाचे कौतुक करण्यात आले आहे.
भारत आणि अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा पुढे नेण्यासाठी भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले आहे.
भारत आणि जपान २०२९-३० मध्ये एकाच वेळी शिंकानसेनची नवीनतम आवृत्ती, अल्फा-एक्स ज्याला E10 म्हणूनही ओळखले जाते ती सादर करण्यास सज्ज आहेत. सर्वात प्रगत इ१०च्या संचलनातून हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात भारताची महत्त्वपूर्ण झेप दर्शवते.
संकट हेच संधीचे दुसरे नाव आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकदा ‘आपदा में अवसर’ असा संदेश देताना दिसतात. दुर्मीळ खनिजांच्या जागतिक राजकारणात हीच उक्ती अगदी खरी ठरताना दिसते. चीनच्या मक्तेदारीने निर्माण केलेल्या संकटात भारताला स्वतःचे स्थान आणि सामर्थ्य सिद्ध करण्याची दुर्मीळ संधी प्राप्त झाली आहे. त्याचे आकलन...
सध्या चीनमधील उत्पादन क्षेत्रात असलेली अपुरी मागणी, वाढता साठा, उद्योगांचे अति-निर्भरत्व आणि मूल्यवाढीऐवजी घटणार्या किमती यामुळे तेथील आर्थिक संकट तीव्र होत चालले आहे. चिनी अर्थव्यवस्थेच्या अस्थैर्याचा भारतालाही धोका आहे का, याचा आढावा म्हणूनच घ्यायला हवा.
भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, जागतिक संघर्षाच्या काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेची गती स्थिर असल्याचे दिसत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणारा हा विकास तळागाळापर्यंत पोहोचला की नाही हे दर्शवणारा ‘गिनी’ निर्देशांक प्रसिद्ध झाला. यामध्ये भारताची प्रगती लक्षणीय अशीच म्हणावी लागेल. मात्र, ही प्रगती जरी ‘गिनी’ निर्देशांकामध्ये दिसत असली, तरीही या निर्देशांकाबाबतही अनेक मतमतांतरे आहेत. त्यामुळेच देशाची प्रगती, गिनी निर्देशांक याचा घेतलेला आढावा...
नितू आणि नवीन रोहरा यांना धर्मांतरित केल्यावर जलालउद्दीन उर्फ छांगूरचे धर्मांधांमध्ये प्रस्थ वाढले. हिंदूंचे धर्मांतरण तसेच, नेपाळमार्गे मुस्लीम घुसखोरांना देशात वसवायचे, हेच त्याचे काम. छांगूर हे का करत होता? तर त्याला बलरामपूर १०० टक्के मुस्लीमबहुल परिसर करायचा होता. असे करता करता, पूर्ण भारत इस्लाममय आणि ‘शरिया’च्या अंतर्गत यावा असे या छांगूरचे स्वप्न होते. त्याने आजपर्यंत एक हजार, ५०० हिंदू महिलांचे धर्मांतरण केले. या धक्कदायक षड्यंत्राचा मागोवा घेणारा हा लेख...
रविवारी नेहमीप्रमाणे जयंतराव, आदित्य आणि त्यांची मित्रमंडळी हॉटेलमध्ये जमली होती. मागच्या काही आठवड्यात आदित्यने ‘एआय’चा वापर शिक्षण, आरोग्य, शेती अशा क्षेत्रांमध्ये कसा होतो हे सांगितले होते. आज मात्र विषयच वेगळा होता, एआय आणि भारतीय संरक्षण क्षेत्र.
राजधानी दिल्लीतील वसंत विहार परिसरात ९ जुलै रोजी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. शिवा कॅम्पजवळ फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना एका भरधाव पांढऱ्या ऑडी कारने चिरडले. या अपघातात आठ वर्षांच्या मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्षलवादी संघटना यूएलएफए(आय) (United Liberation Front of Assam-Independent) च्या म्यानमारमधील काही शिबीरांवर भारतीय सैन्याने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा यूएलएफएने केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वेस्टर्न रिजन मिनिस्टर्स कॉन्फरन्स ऑन सिव्हिल एव्हिएशन’ मुंबईत संपन्न झाली.
युरोपीयन राष्ट्र हंगेरी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुडापेस्टच्या भारतीय दूतावासातील अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्रात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण कला सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून त्यांच्या कला-साधनेप्रती असलेली निष्ठा आणि गुरूविषयी असलेली भक्ती स्पष्टपणे दिसून आली.
हिंदू परंपरेत विवाह केवळ एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आणि सात जन्मांचं नातं मानलं जातं. हा विवाह केवळ त्या दोन व्यक्तींचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजालाही जोडणारा एक महत्त्वाचा बंध असतो. त्यामुळे पूर्वीपासून धर्म, कर्तव्य आणि समाजात संतुलन राखण्याच्या दृष्टीने विवाह संस्काराला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल अनेक विवाहांमध्ये आधुनिकतेच्या आग्रहापायी पारंपरिक विधी कमी प्रमाणात होत असले, तरी अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा सर्व भारतीय परंपरा आणि विधींसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भारताने २०२४ मध्ये आपल्या सागर (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) दृष्टिकोनातून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भूमिका अधिक बळकट केली असून, या क्षेत्रातील शांतता, स्थिरता व समृद्धीसाठी भारताची महत्त्वपूर्ण जबाबदारी अधोरेखित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२४च्या वार्षिक अहवालात तसे नमूद करण्यात आले आहे.
(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर
एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाची दोन्ही इंजिने उड्डाणानंतर काही सेकंदांच्या आत बंद पडल्याने अपघात झाला, असे अपघात तपासाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक शक्ती संतुलन नव्याने रचले जात असताना २०२५ सालामधील ‘ब्रिक्स’ परिषद ही नव्या युगाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. अमेरिका केंद्रित जागतिक व्यवस्थेला पर्याय उभारण्याच्या दिशेने ‘ब्रिक्स’ची वाटचाल अधिक ठाम होते आहे. अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका केवळ सहभागी सदस्य म्हणून नव्हे, तर विचारप्रवर्तक आणि सूत्रधार म्हणून अधिक व्यापक होते आहे. २०२५ साली झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या विविध पैलूंचा घेतलेला आढावा...
शहरी नक्षलवादाच्या वाढत्या विषवल्लीला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक’ दोन्ही सभागृहामध्ये पारित करून घेतले. या कायद्यामुळे शहरी नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी दंडशक्तीला कायद्याचे बळ मिळणार आहे. या विधेयकांवरूनही विरोधकांनी राजकारण केलेच. मात्र, काहीही असले तरीही हे विधेयक राज्यातील शहरी नक्षलवाद्यांच्या निरंकुश व्यवहारांना चाप लावेल हे नक्की. या विधेयकातील तरतुदी, सरकारची मानसिकता आणि त्यातील बारकावे यांचा घेतलेला आढावा...
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या आकडेवारीनुसार, ‘एसआयपी’द्वारे भारतातील म्युच्युअल फंडची गुंतवणूक 27 हजार 269 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जून महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणार्या गुंतवणुकीने उच्चांक गाठला आहे. ‘एसआयपी’च्या एकूण खात्यांची संख्या 9.06 कोटींवरुन वाढून 9.19 कोटी इतकी झाली आहे. यानिमित्ताने म्युच्युअल फंड क्षेत्रातील भारतीय अर्थभरारीचा आढावा घेणारा हा लेख...
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गौरव रेल्वेद्वारे 'अष्ट ज्योतिर्लिंग' या श्रावण विशेष यात्रेला सुरुवात करणार आहे.एकूण १३ दिवसांच्या दौऱ्यामध्ये द्वारका (नागेश्वर), सोमनाथ, उज्जैन (महाकालेश्वर), ओंकारेश्वर, नाशिक (त्र्यंबकेश्वर), औरंगाबाद (घृष्णेश्वर), परभणी (परळी वैज्यनाथ) आणि मल्कापुर्लीस (मल्कापुर्लम) या आठ ज्योतिर्लिंग मंदिरांचा समावेश असेल.