भारतीय राष्ट्रीय सौर कालगणना

    20-Mar-2021
Total Views | 523

kalgnana_1  H x



निरनिराळ्या देशातील कालगणना निरनिराळ्या आहेत. काही सूर्याच्या भ्रमणावर आधारित, तर काही चंद्राच्या भ्रमणावर. ऋतू हे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत. सूर्याचे एक वर्ष ३६५ दिवसाचे, तर चंद्राचे वर्ष ३५४ दिवसांचे आहे. त्यामुळे आपल्या भारतीय कालगणनेत २५-३० महिन्यांनी एक अधिक महिना घेऊन याचे एकत्रीकरण केले आहे. मात्र, मुसलमानी कालगणना पूर्णपणे चंद्रावर अवलंबून आहे. आपला भारतीय दिवस, वार सूर्योदयानंतर सुरू होतो, तर इंग्रजी कालगणनेत तो रात्री १२ नंतर सुरू होतो, तर मुस्लीम कालगणनेत तो सूर्यास्तानंतर सुरू होतो.


आता फाल्गुन संपला की, आपले नवीन भारतीय वर्ष शके १९४३ दि. ११ एप्रिल, २०२१ रोजी चालू होईल. त्याआधी दि. २२ मार्चला नवीन भारतीय सौरवर्ष चालू होईल. वार्षिक कालगणना अचूक व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न झाले. सूर्याची वार्षिक प्रदक्षिणा म्हणजे एखाद्या ठरावीक तार्‍यापासून निघून परत त्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा वेळ.हा वेळ आहे ३६५ दिवस सहा तास नऊ मिनिटे आणि दहा सेकंद. यातले सहा तास चार वर्षांनी एकत्र करून ‘लीप इयर’ म्हणून ३६६ दिवसाचे होते. पण, वरची नऊ मिनिटे आणि दहा सेकंद तसेच राहतात. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस १५७ वर्षांनी एक दिवस पुढे जातो. सुरुवातीला संक्रांत २२ डिसेंबरलाच होती. पण, दर १५७ वर्षांनी एक दिवसाचा फरक पडू लागला आणि १९७४ नंतर संक्रांत १४ जानेवारीला येऊ लागली. २१०० सालानंतर ती १५-१६ जानेवारीला येईल. असो.

निरनिराळ्या देशातील कालगणना निरनिराळ्या आहेत. काही सूर्याच्या भ्रमणावर आधारित, तर काही चंद्राच्या भ्रमणावर. ऋतू हे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत. सूर्याचे एक वर्ष ३६५ दिवसाचे, तर चंद्राचे वर्ष ३५४ दिवसांचे आहे. त्यामुळे आपल्या भारतीय कालगणनेत २५-३० महिन्यांनी एक अधिक महिना घेऊन याचे एकत्रीकरण केले आहे. मात्र, मुसलमानी कालगणना पूर्णपणे चंद्रावर अवलंबून आहे. आपला भारतीय दिवस, वार सूर्योदयानंतर सुरू होतो, तर इंग्रजी कालगणनेत तो रात्री १२ नंतर सुरू होतो, तर मुस्लीम कालगणनेत तो सूर्यास्तानंतर सुरू होतो. वर्षाची रचना अचूक व्हावी म्हणून अनेकांनी अनेक पर्याय सुचवले. त्यापैकी एक शंकरराव मराठे म्हणतात की, “वर्षाचे दहा महिने आणि प्रत्येक महिन्याचे ३६ दिवस करावे. म्हणजे वर्षाचे ३६० दिवस होतात.” बाकी दिवस कसे संयोजित करावे तेही दिले आहे. पण, किचकट आहे. दुसरे र. वि वैद्य म्हणतात की, “वर्ष १३ महिन्यांचे आणि प्रत्येक महिना २८ दिवसाचा करावा. यात वर्षाचे ३६४ दिवस होतात. एक दिवस वर्षाचे शेवटी घ्यावा, त्या दिवशी कोणताही वार नाही.” आणखी एक जण ल. म. चक्रदेव म्हणतात की, “सगळे महिने काढून टाका, फक्त दिवस आणि वर्ष ठेवा. म्हणजे १ मार्च, २०२१ म्हणायच्या ऐवजी ६०/२०२१ असे म्हणा.” असे निरनिराळे विचार होते. सध्या चालू असलेली इंग्रजी कालगणना बरीचशी अचूक असली तरी महिन्याची व वर्षाची सुरुवात अशास्त्रीय आहे. सुरुवातीला त्यांचे वर्षही दहा महिन्यांचे होते. नंतर त्यात फेब्रुवारी, जानेवारी हे महिने घालण्यात आले. पण, महिन्याचे दिवस २९-३० असल्यामुळे वर्षाचे दिवसाचे गणित जमेना, मग आपल्या भारतीय कालगणनेप्रमाणे सूर्याच्या गतीबरोबर जुळण्यासाठी ‘अधिक फेब्रुवारी’ सुरू करण्यात करण्यात आला.

पण, तो २० दिवसाचा. तरीही कालमापन अचूक येईना. परत सुधारणा झाली, होत राहिली. पुढे अचूकता आली. पण, जानेवारी-फेब्रुवारी हे महिने वर्षाच्या सुरुवातीला आल्यामुळे पूर्वीचा महिन्याचा अनुक्रम बदलला. सप्टेंबर, ऑक्टोबर सातवे-आठवे असलेले नववे-दहावे झाले. निरनिराळ्या कालगणनेतील अशा प्रकारच्या उणिवांचा विचार करून सुयोग्य आणि शास्त्रीय दृष्टीने अचूक अशी भारतीय सौर कालगणना तयार करण्याचे भारत सरकारने ठरविले. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीच्या सूचनेनुसार दि. २२ मार्च, १९५७ पासून नवीन सौर भारतीय कालगणना सुरू झाली. त्याला भारतीय पद्धतीने चैत्र, वैशाख अशी नावे देण्यात आली. वर्षाची गणना शालिवाहन शकानुसार करण्यात आली. यात अधिक महिना नाही. दिवसाची किंवा दिनांकाची सुरुवात रात्री १२ वाजल्यानंतर होईल. सूर्याच्या गतीनुसार पाच महिने म्हणजे वैशाख ते भाद्रपद ३१ दिवसांचे (लीप इयर किंवा प्लुत वर्षी चैत्र धरून सहा महिने) आणि बाकीचे महिने ३० दिवसांचे. वर्षाची सुरुवात म्हणजे, सौर चैत्र १ नेहमी वसंत संपातचे दिवशी म्हणजे २२ मार्चलाच (लीप इयरमध्ये २१ मार्च) होईल. शरद संपात नेहमी १ अश्विन रोजी म्हणजे २२ सप्टेंबर रोजी असेल. (लीप इयरमध्ये २१ सप्टेंबर) या दोन्हीही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्याने सर्व पृथ्वीवर दिवसरात्र समान असतात. म्हणजे नवीन वर्ष आरंभ करण्यासाठी योग्य दिवस. म्हणून आपली नवीन भारतीय सौर कालगणना २२ मार्च रोजी १ सौर चैत्रपासून सुरू होत आहे. अर्थात, धार्मिक कार्यासाठी तिथी नक्षत्र याचा वापर होईल. अशा प्रकारे ही एक आदर्श भारतीय कालगणना तयार केली आहे. रिझर्व्ह बँकेनेही चेकसाठी भारतीय सौरदिनांक व्यवहार्य ठरवून तसा आदेश काढला आहे.


आता प्रश्न पडतो की, आपली नवीन सौर कालगणना एवढी उपयुक्त असूनही त्याचा प्रसार किवा वापर का होत नाही? त्याचे मुख्य कारण शासन किंवा जनता त्या बाबतीत आग्रही नाहीत. त्याचा व्हावा तेवढा प्रचार झाला नाही. त्यासाठी शासनाने सर्व आर्थिक व्यवहार, अर्थसंकल्प, महिन्याचे पगार वगैरे नवीन सौरकालगणनेप्रमाणे करायला पाहिजे, असे केले तरच ही कालगणना लोकप्रिय होईल व आपली म्हणून ओळखली जाईल. पूर्वीच्या शासनाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या, त्यातील ही एक महत्त्वाची सुधारणा आहे. आता याचा व्यवहारात वापर व्हावा, म्हणून माझी सर्व आमदार-खासदार यांना विनंती आहे की, या कालगणनेचा शासनाच्या सर्वच व्यवहारात वापर व्हावा म्हणून पाठपुरावा करावा.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121