एमपीएससी परीक्षा २१ मार्चला होणार ; विद्यार्थ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

    12-Mar-2021
Total Views | 84

mpsc_1  H x W:



मुंबई :
काल ११ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्चला रोजी रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुळात सरकारने २१ तारखेला परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी केली असेल तर मग ती १४ तारखेला का होऊ शकत नाही, असा सवाल अनेक विद्यार्थी विचारत आहेत. काहीवेळापूर्वीच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयावर भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हेदेखील पाहावे लागेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख शुक्रवारीच घोषित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली काल ११ मार्च रोजी जनतेला संबोधत देत असताना दिली होती. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.





mpsc_1  H x W:
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121