मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७२ वर्ष देशभरात सुसंस्कृत व देशभक्त विद्यार्थ्यांची फळी उभारण्याचे काम अविरत करत आहे.शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये अभाविप प्रत्येक वर्षी प्रदेश अधिवेशन आयोजित करत असते. त्याच अनुषंगाने या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रांत अधिवेशन स्व.मा.गो.वैद्य परिसर, एस.नी.डी.टी महिला विद्यापीठ,चर्चगेट येथे ३१ जानेवारी २०२० रोजी मोठ्या उत्साहात, कोव्हिड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करत पार पडले.
हे अधिवेशन स्व.अनिकेत ओव्हाळ सभागृहात पार पडले. दरवर्षी अधिवेशनात प्रांतातील २५ जिल्ह्यातील वर्षभरातील कार्यक्रमांची प्रदर्शनी करण्यात येते.यावर्षी प्रदर्शनीला स्व. गायत्री धर्मे यांचे नाव दिले होते. या अधिवेशनात १३२ विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रदेश अधिवेशनात शैक्षणिक समस्यांवर अभाविप ची पुढील वर्षभरातील आगामी भूमिका ठरवण्यात आली.त्याचसोबत विविध शैक्षणिक,सामाजिक मुद्द्यांवर चर्चा व प्रस्ताव देखील पारित करण्यात आले.
या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे एम.डी व सी.ई.ओ मा.आशिष कुमार चौहान ,विशेष उपस्थिती एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू मा.शशिकला वंजारी मॅडम, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा.आशिष चौहान जी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.जी.लक्ष्मण जी हे उपस्थित होते."येत्या काळात विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात संशोधनात्मक कार्य करण्याची गरज आहे" असे मत प्रमुख अतिथी मा.आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केले."कार्यकर्त्यांनी,विद्यार्थ्यांनी अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची मूल्ये घेत त्यांचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा" असे आवाहन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.जी.लक्ष्मण जी यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रदेश अधिवेशनाचे समारोप कोंकण प्रदेश संघटनमंत्री संतोष तोनशाळ यांनी केल. सन २०२०-२१ या वर्षासाठी कु.प्रेरणा पवार यांनी प्रदेश मंत्री व प्रा.मंदार भानुशे यांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२० च्या अंमलबजावणी करता शासन व विद्यापीठाने त्वरित कारवाही करावी,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळाव्यात ,अधिकाऱ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात वेळखाऊ वृत्ती बंद करावी ,विलगीकरणासाठी वापरण्यात आलेली वस्तीगृह पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुली करावीत, राज्य सेवा आयोगा साठी पूर्णवेळ संचालकांची नेमणूक करावी,कमवा व शिका योजनेची व्याप्ती वाढवावी,खासगी विद्यापीठ शुल्का बाबत शुल्क नियंत्रण समिती असावी ,महाविद्यालय हे टप्प्याटप्प्याने सुरू करावीत या सर्व मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील अभाविप कोंकण प्रदेशमंत्री कु.प्रेरणा पवार यांनी दिला.सदर पत्रकार परिषदेस कोंकण प्रांतमंत्री प्रेरणा पवार, कोंकण प्रांत राष्ट्रीय कलामंच संयोजक सिद्धी वैद्य, ठाणे महानगरमंत्री रमाकांत मांडकुलकर उपस्थित होते.