मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमवीर सिंह यांचं राज्य सरकारने अखेर निलंबन केले आहे. ते होमगार्डचे संचालक म्हणून रुजू होते. देशमुखांवर आरोप केल्यानंतर परमवीर सिंह तपास यंत्रणांपुढे हजर होत नव्हते. आपल्याला मुंबई पोलीसांपासून धोका आहे, असा दावा त्यांच्या वकिलाने केला होता. तपास
सीबीआयकडे सोपवावा त्यांनंतर मी हजर राहीन, असा युक्तिवादही करण्यात आला. मात्र, काही कालावधीनंतर परमबीर सिंग पोलीसांपुढे शरण आले. तरीही ते पोलीस खात्यात रुजू होते. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. दरम्यान, याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असल्याने हा निर्णय प्रलंबित होता. अखेर गुरुवारी रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर परमवीर सिंह यांच्या बडतर्फीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.