आता ठाण्यात सापडले मृत गिधाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |
vulture_1  H x


महानगरपालिकेने गिधाडाला घेतले ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी) - ठाण्यातील ओवळे गावात आज दुपारी एक मृत गिधाड आढळले. बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी या मृत गिधाडाला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. हे गिधाड ग्रिफाॅन जातीचे असून गेल्या आठवड्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जखमी ग्रिफाॅन गिधाड आढळले होते.


आठवड्याच्या सुरुवातीला ठाण्यातील वाघबीळ परिसरात काही पाणबगळे मृतावस्थेत आढळून आले होते. देशातील राज राज्यांमध्ये पसरलेल्या बर्ड फ्लूच्या साथ पसरली असल्याने या पक्ष्यांचीही चाचणी करण्यात आली. त्यासाठी पक्ष्यांचे नमुने पुण्यात पाठविण्यात आले. काल या पक्ष्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असताना, आज दुपारी ठाण्यातील ओवळा गावात मृत गिधाड आढळून आले. हे गाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येते. याठिकाणी मृत गिधाड आढळल्याने ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या पक्ष्याला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीची पुढील कारवाई ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. दरम्यान गेल्या आठवड्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील सिंह सफारीच़्या आवारात ग्रिफाॅन प्रजातीचे गिधाड दिसले होते. ते जखमी होते. त्यामुळे हाच पक्षी आता ठाण्यात मृतावस्थेत सापडल्याची शक्यता आहे. 
@@AUTHORINFO_V1@@