डॉक्टरांचे निवृत्तीचे वय एक वर्षाने वाढवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

doctor_1  H x W




२०२१ मध्ये निवृत्त होणार्‍या डॉक्टरांनाच संधी




मुंबई: कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय एका वर्षाने वाढविण्यात येणार आहे. २०२१ मध्ये निवृत्त होणार्‍या डॉक्टरांनाच ही संधी मिळणार आहे.कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय एक वर्षाने वाढणार आहे.



सेवानिवृत्तीचा हा निर्णय २०२१ मध्ये पालिकेचे जे वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनाच लागू होणार आहे. सध्या पालिका रुग्णालयात सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍याच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणारी आरोग्यसेवा देशभरात नावाजलेली आहे. या पालिका रुग्णालयात सर्व संर्वगातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे.



एकीकडे कोरोनाचा संसर्ग असताना महापालिकेत वरिष्ठ डॉक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणांतर्गत पदे भरण्यासाठी आलेली स्थगिती, पदोन्नतीसाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध नसणे, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीने सतत रिक्त होत असलेली पदे, यामुळे सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांपैकी ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळेही सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून एक वर्षाच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.




@@AUTHORINFO_V1@@