गौतम बुद्धांच्या जन्मस्थळावरून भारत-नेपाळमध्ये वादाची ठिणगी!

    10-Aug-2020
Total Views | 114
Nepal_1  H x W:


परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानावर नेपाळने घेतला आक्षेप!


नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध यांचा ‘भारतीय’ असा उल्लेख केला होता. परराष्ट्र मंत्र्यांच्या याच विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी आपली बाजू मांडली आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात नव्हे, तर नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचे जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे, असे नेपाळकडून म्हटले गेले आहे.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सीआयआयच्या शिखर संमेलनात बोलताना म्हणाले, महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुद्ध असे भारतीय महापुरूष आहेत, ज्यांचे जग नेहमीच स्मरण करत असते. आतापर्यंतचे सर्वात महान भारतीय कोण असेल, तर मी म्हणेन गौतम बुद्ध आणि दुसरे महात्मा गांधी हे आहेत. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळने आक्षेप घेतला आहे.


यावर, विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आमच्या बोलण्याचा अर्थ गौतम बुद्ध नसून, त्यांच्या शिकवणीबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचबरोबर गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळ मधील लुंबिनी येथेच झाला असून, याविषयी तिळमात्र ही शंका नसल्याचे त्यांनी म्हंटले.


नेपाळने नकाशा दुरुस्ती विधेयकानुसार भारतातील उत्तराखंडमधील कालापानी, लीपूलेख आणि लिम्पियाधुरा हे प्रदेश आपले असल्याचे दाखवले आहे. नेपाळने नव्या नकाशात भारताचा सुमारे ३९५ चौ. किमीचा भाग आपल्या सीमेत दाखवला आहे. नेपाळ भारतातील ज्या भागावर आपला दावा करत आहे, तो भाग १८१६च्या सुगौली करारानुसार आजही भारताच्या अखत्यारीत येतो.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121