दहावीचा निकाल जाहीर : कोकण विभागाची बाजी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |
SSC_1  H x W: 0




मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला. साधारण राज्यातील १७ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.



बुधवारी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल आला आहे, तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. पुणे ९४.३० टक्के, नागपूर ९३.८४ टक्के, औरंगाबाद ९२ टक्के निकाल लागला आहे.





तर मुंबई ९६.७२ टक्के, कोल्हापूर ९७.६४ टक्के, अमरावती ९५.१४ टक्के, नाशिक ९३.७३ टक्के, लातूर ९३.०७ टक्के, कोकण ९८.७७ टक्के इतका निकाला लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून दहावीचा निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या वर्षात एकूण ९६.९१ तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
३ मार्च २०२० ते २३ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाल्याने निकालास विलंब झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर संकेतस्थळांवर mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन !

@@AUTHORINFO_V1@@