पालघर साधू हत्या प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020
Total Views |
Palghar_1  H x

आरोपी वाडा पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत होते अटकेत; वाडा पोलीस ठाणे राहणार बंद 

वाडा : पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकाण्ड प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे कोरोना चाचणीनंतर पुढे आले असून या कैद्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया उशीरा पर्यंत सुरु होती.


गडचिंचले हत्याकांड प्रकरणातील १७ आरोपी न्यायालयीन कोठडीत वाडा पोलीस ठाण्यात अटकेत होते. तीन दिवसांपूर्वी या आरोपींना वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींची कोरोना चाचणी केल्यानंतर १७ पैकी ११ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. या कोरोना बाधीतआरोपींना न्यायालयाच्या परवानगीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. तर कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात जे पोलिस कर्मचारी, अधिकारी आले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रीयाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


अकरा आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांच्याही आता चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून वाडा पोलीस ठाणे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाडा पोलीस ठाण्याला लागूनच तहसीलदार कार्यालय असून ते कार्यालयही दोन दिवस बंद राहणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@