पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील दोन अधिकारी बेपत्ता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |
Indian Embassy_1 &nb

याआधी भारतीय राजदूतांना धमकावण्याचा झाला होता प्रयत्न!

इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील २ भारतीय अधिकारी बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानमधील भारतीय दुतावासातील हे अधिकारी सकाळी ८.३० च्या सुमारास बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. यानंतर पाकिस्तान सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


सीआयएसएफचे दोन ड्रायव्हर ड्यूटीवर बाहेर जात होते. मात्र, ते आपल्या ठिकाणावर पोहचण्याआधीच बेपत्ता झाले. त्यांच्या अपहरणाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर चालकांचा तपास सुरु आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देखील देण्यात आली आहे.


याआधी भारतीय राजदुतांना धमकावण्याचा प्रयत्न झाला होता. आयएसआयच्या एजंटने भारतीय राजदुताचा पाठलाग करत त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारताने आधीच आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता दोन चालक बेपत्ता झाल्याने या तणावात आणखीच भर पडणार आहे.


दिल्ली पोलिसांनी १ जूनला पाकिस्तानी दूतावासच्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना पकडले होते. हे दोघे एका व्यक्तीला पैसे देऊन सुरक्षेसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे घेत होते. दोघेजण व्हिजा असिस्टेंट पदावर कार्यरत होते. पकडल्यानंतर त्यांनी स्वतःला भारतीय नागरिक सिद्द करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे फेक आधार कार्ड, भारतीय मुद्रा आणि आयफोन मिळाला होता. भारताने या दोघांना २४ तासांच्या आत पाकिस्तानात परत पाठवले होते.
@@AUTHORINFO_V1@@