रा.स्व.संघातर्फे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी अन्नदान

    09-Apr-2020
Total Views | 192
Pune Rss _1  H

पुणे : लॉकडाऊनमुळे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या आणि देहविक्री व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांची, त्या वस्तीतील अन्य वृद्ध महिलांची उपासमार होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे त्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जेवणाची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
वस्तीमध्ये अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न तयार करण्यासाठी एका संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे. जेवण बनवण्याचे काम शाम चंदनशिवे हे आचारी करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी काही कामगारही सरसावले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व प्रकारची दक्षता घेऊन अन्न शिजवले जात आहे.
 
तेथे तयार होत असलेली अन्नाच्या पाकिटांचे पॅकिंग एका वेळी फक्त चार कार्यकर्ते करत आहेत. तसेच ते अन्न नियमितपणे वेश्यावस्तीत पोहोचवले जात आहे. या कामासाठी एका कार्यकर्त्याने ४०० किलो तांदूळ दिला. तर अन्य एकाने मुबलक प्रमाणात गव्हाचे पीठ दिले आहे. मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनीही मदत दिली. त्यामुळे पुढील सुमारे २० दिवस या वस्तीतील ३०० महिलांना एकवेळचे जेवण मिळेल एवढा शिधा जमा झाला आहे.
 
समाजाकडून उपेक्षा होत असलेल्या या महिलांना आपत्तीच्या काळात अन्न देण्यासाठी सुरु झालेल्या या केंद्रातून आता शहराच्या विविध भागातील अनेक गरजूंनाही अन्न दिले जात आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर, शहरी गरीब अशा अनेक दुर्बल घटकांचे जीवन यामुळे सुसह्य झाले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121