सिंधुदुर्गातील 'त्या' सहा व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |
corona_1  H x W


पाॅझिटिव्ह रुग्णाचा संपर्कात आल्या होत्या या व्यक्ती

 
 
मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले सहा जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. स्थानिक आमदार नितेश राणे ही माहिती दिली आहे. रत्नागिरीनंतर गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता.
 
 
 
 

 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोकणात भितीचे वातावरण पसरले होते. अशात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळ्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले होते. मॅंगलोर रेल्वेने सिंधुदुर्गात परतताना या व्यक्तीचा संपर्क कर्नाटकातील कोरोना बाधित व्यक्तीशी आला होता. त्यामुळे त्याला देखील कोरोनाची बाधा झाली. हा व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह समज्यावर सिंधुदुर्गातील आरोग्य प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींची चाचणी केली होती. त्याचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्या सहा व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी टि्व्ट करुन दिली.
@@AUTHORINFO_V1@@