[GST] वस्तू व सेवा कर: फेब्रुवारी महिन्यात १,०५,३६६ करोड रुपये सरकारच्या तिजोरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |


GST_1  H x W: 0


देशांतर्गत उत्पादनात ८ टक्के वाढ तर आयातीत २ टक्के घट

वृत्तसंस्था : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जीएसटी वसुलीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महिन्याभरात एक लाख पाच हजार तीनशे सहासष्ट करोड रुपये इतका महसूल वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी २०१९ मध्ये ९७,२४७ करोड रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले होते. तुलेनेने १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी-२०२० महिन्यात गोळा झालेल्या एकूण कराच्या रकमेत २०,५६९ करोड रुपये केंद्राचा तर २७,३४८ करोड रुपये इतका राज्याचा वाटा असणार आहे. तर आंतर राज्य वस्तू सेवा कर ४८,५०३ करोड रुपयाचा आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्राच्या महसुलात ११४ टक्के वृद्धी झाल्याचे दिसुन येते. महाराष्ट्रातून १५,७३५ करोड रकमेच्या कराचा भरणा झाला आहे. फेब्रुवारी २०१९ शी तुलना करता देशांतर्गत उत्पादनातून मिळवलेल्या महसुलात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याउलट गेल्यावर्षीच्या तुलनेत आयातीवर गोळा करण्यात आलेल्या वस्तू-सेवा करात २ टक्क्यांनी घट झाली आहे. झारखंड, पुद्द्चेरी व लक्षद्वीप वगळता सर्वच राज्यातून गोळा झालेल्या महसुलात वाढ झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@