लोकसेवेचे महानायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

KOTAK MANOJ _1  

 
 

‘सेवा परमो धर्म:’, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे खा. मनोज कोटक. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे ईशान्य मुंबईच्या रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. मनोज कोटक यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी कोविड काळात केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
 
नाव : मनोज कोटक
पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : खासदार, ईशान्य मुंबई
प्रभाग क्र.: १०३, सर्वोदय नगर, नाहूर गाव
संपर्क : ८०८०८८०८८०
 
 
 
मनोज कोटक यांना नगरसेवक, मग मुंबई महानगरपालिकेत भाजपचे गटनेता आणि आता खासदार अशा राजकीय कारकिर्दीमुळे प्रशासकीय अनुभव दांडगा होताच. त्याबरोबरच ईशान्य मुंबईचेच नव्हे, तर संपूर्ण मुंबईचे प्रश्नही त्यांना चांगलेच अवगत आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात ईशान्य मुंबईच्या कोणत्या वस्तीत काय घडू शकते, याचा त्यांना अभ्यास होताच. कोरोनाकाळात या अभ्यासाचा चांगला उपयोग झाला. मनोज कोटक यांनी कोरोनाकाळातील सेवाकार्य करताना केवळ भावनेवर भर दिला नाही, तर ईशान्य मुंबईच्या प्रत्येक भागानुसार कोणत्या भागात कोणते प्रश्न आहेत, याची रीतसर माहिती घेतली आणि सेवा आराखडाच तयार केला. त्यांनी सेवाकार्याचे टप्पे आखले. पहिल्या टप्प्यात रोजगार गेल्यामुळे कामगार, मजुरी करणार्‍या बहुसंख्य लोकांना एकवेळचे अन्न मिळविण्याचीही मारामार झाली. अशावेळी मनोज कोटक यांनी जिल्ह्यातील सहाही विधानसभांमध्ये अन्नछत्र सुरू केले. दररोज सकाळ-संध्याकाळ हजारो लोकांना इथून अन्न वितरीत केले जाई.
 
 
 
 
त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता तो आरोग्यसेवेचा. खासगी दवाखाने बंद होते. कोरोना रुग्णालय किंवा ‘क्वारंटाईन सेंटर’ याबद्दल लोकांच्या मनात अनेक संभ्रम होते. त्यातच महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार लोकांच्या मनात अधिकच धडकी भरवत होता. त्यामुळे लोक आजारी पडले तरी दवाखान्यात जात नसत. त्यामुळे कोरोनामुळे नाही तर इतर आजारांमुळे लोकांचा मृत्यू होऊ लागला. अशा काळात मनोज कोटक यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यात प्रत्येक वस्तीत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. हजारो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर कमी झाला. तसेच जिल्ह्यातील १४ कोरोना केअर सेंटरलाही आवश्यक मदत केली.
 
 
 
 
याच काळात मनोज कोटक यांनी हजारो धान्य किट वितरणही केले. हे वितरण करण्यासाठीही त्यांनी व्यवस्था तयार केली. प्रत्येक परिसरातून एक व्यक्ती प्रमुख असेल, ती वस्तीतल्या भागातून काही व्यक्तींशी संपर्क करेल. या व्यक्तींनी त्या त्या भागातील गरजू-गरीब लोकांची यादी बनविली. यामध्ये सर्व वितरणाची नोंद ठेवली गेली. त्याद्वारे संपूर्ण सेवाकार्य पारदर्शक स्वरूपात झाले. तसेच संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये घरोघरी ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्या, प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या काढ्याचेही वितरण मनोज कोटक यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक वस्तीत, गल्लीमध्ये जंतुनाशक फवारणी व्यवस्था केली, त्याची अंमलबजावणी सुरळीत होईल याकडे लक्ष दिले.
 
 
 
 
या काळात त्यांनी भाजपमधील प्रत्येक लोकप्रतिनिधीला, पदाधिकार्‍याला आणि कार्यकर्त्यांनाही सेवाकार्य करण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत दिली. सेवाकार्य करताना कुणी आजारी पडलेच तर त्याची पूर्ण जबबादारीही घेतली. मास्कवाटप, सॅनिटायझरवाटप, प्रतिकारशक्ती वाढविणारे उच्च दर्जाचे आरोग्यवर्धक खाद्यजिन्नस, औषधे यांचे वितरण जिल्ह्यातील पोलीस स्थानक, दवाखाने, सफाई कामगार, तसेच कोरोनाकाळात काम करणार्‍या ‘कोविड योद्धां’ना दिले. कोरोनाकाळात सर्वचस्तरावर सारखे नियम बदलत होते. या नियमांबद्दल माणुसकीच्या दृष्टीने काय करू शकतो? याबद्दलही कोटक यांनी ईशान्य मुंबईतील सोसायट्यांसाठी ऑनलाईन मिटिंग घेतली. सोसायट्यांना थर्मल गनचे वितरण केले. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीही मनोज कोटक यांनी पद्धतशीर काम केले.
 
 
 
 
हे काम करत असताना रेशन दुकानातील वितरण समस्या किंवा खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिल समस्या किंवा विजेचे आलेले तिप्पट बिल, यामुळे जनता त्रस्त होती. मनोज कोटक यांनी त्या-त्या स्तरावर हे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. तसेच लोकल ट्रेन सुरू झाली. पण, ती काही स्थानकांवर थांबत नव्हती. जसे विक्रोळीला थांबत नव्हती, तर मनोज कोटक यांनी संबंधित यंत्रणेकडे यासाठी पाठपुरावा केला. हे सगळे करत असताना समाजातील सज्जन आणि सुस्थापित शक्तींना भेटून त्यांना कोरोना समाजसेवेत उतरविणे, असे मोठे काम कोटक यांनी केले. कोटक यांच्या माध्यमातून अनेक उद्योगपतींनी पंतप्रधान निधीमध्ये सहयोग केला. अनेक सेवाभावी संस्था जिल्ह्यात सेवाकार्य करू लागल्या.
 
 


KOTAK MANOJ _2  


"आगामी कालावधीत आणखी लोकोपयोगी योजना घेऊन ते कार्यरत असतीलच. खासदार आहेत म्हणून लोकांच्या मनोज कोटक यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि या सर्वच अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या. मनोज कोटक म्हणजे, लोकसेवेचा महानायकच होय. कोरोना काळात जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे मिळाली. मोदीजी नेहमी सांगतात की, स्वार्थासाठी सत्ता नाही, तर देशसेवेसाठी सत्ता आहे. मतदार संघाचा खासदार म्हणण्यापेक्षा आपल्या समाजातील एक घटक म्हणून मी कोरोना काळात विविध स्तरावर सेवाकार्य करू शकलो. कारण, संघ संस्कार आहेत माझ्यावर. हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मा!"
 
 
 
आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू आहे. कामधंदेही सुरू होत आहेत, अशावेळी रिक्षाचालकांचा प्रश्न मोठा होता. कोरोनाकाळात रिक्षा, टॅक्सीचालकांना खूप फटका बसला. कोटक यांनी या वाहनचालकांना रेशनकिटचे वाटप तर केलेच; शिवाय रिक्षाला लावण्यासाठी कोरोना प्रतिरोध शिल्डही दिले, जे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये कोरोना प्रतिरोधक म्हणून काम करते. कोरोनाच्या भीतीमुळे रिक्षा बाहेर न काढणारे चालक किंवा रिक्षात न बसणारे प्रवासी आता निर्धास्त होऊन रिक्षात प्रवास करू लागले.
 
 
 
 
नेता म्हटला की, तो केवळ एअरकंडिशन कॅबिनमध्ये बसतो आणि ऑर्डर सोडतो, असा लोकांचा समज असतो. पण, खा. मनोज कोटक यांनी कोरोनाकाळात वस्तीपातळीवर काम करून लोकांचा गैरसमज दूर केला. या सर्व काळात त्यांचे कार्यालय सुरू होते. त्यांच्या कार्यालयाचे नावही ‘सेवालय’ आहे, हे विशेष. सेवावस्ती, सोसायटी, हातावर पोट असणारे गरीब गरजू ते परदेशात अडकलेले एनआरआय, या सार्‍यांसाठी मनोज कोटक या कोरोनाकाळात आशेचा दीपस्तंभ होते.
 
 
 
 
संकटकाळात सेवाकार्य करणारा एक नायक असतो हे वास्तव आहे. पण, मनोज कोटक हे सेवाकार्याचे असे महानायक आहेत की, त्यांच्या सेवाभावाची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात अनेक निःस्वार्थी सेवाव्रती नायक तयार झाले. हे वस्तीपातळीवरचे नायक समाजासाठी जीवाची पर्वा न करता काम करत होते. कारण, त्यांचे म्हणणे होते की, ‘आमचे खासदार २४ तास काम करतात, तर आम्ही शांत कसे बसू? आणि आम्हाला काही झाले तर आमचा खासदार आमच्या पाठीशी भक्कम उभा आहे.’ कोणत्याही वाद-विवाद चर्चेत वेळ वाया न घालवता, मितभाषी आणि अजातशत्रू असलेल मनोज कोटक केवळ सेवा आणि सेवाच करत राहिले. खासदार म्हणून मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईत केलेले सेवाकार्य अतुलनीय आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@