२१ डिसेंबरला आकाशात दिसणार 'या' ग्रहांची ऐतिहासिक युती

    01-Dec-2020
Total Views | 116

planet _1  H x



महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर ही महायुती दिसेल


मुंबई (प्रतिनिधी) - येत्या २१ डिसेंबर रोजी गुरू आणि शनि हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसणार आहेत. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. इंग्रजीत याला 'कंज्कशन' म्हणतात. गुरू आणि शनि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह आहेत. येत्या २१ तारखेला या दोन ग्रहांची 'महायुती' होणार आहे.
 

 

२१ डिसेंबर २०२० रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणी ६ विकला) अंतरावर असतील. तुलनेने चंद्राचा सरासरी कोनीय व्यास हा ०.५ अंश आहे. दुर्बिणीच्या शोधानंतर दुसर्‍यांदा हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत. या पूर्वी १६ जुलै १६२३ रोजी हे ग्रह जेव्हा इतके जवळ आले तेव्हा त्यांच्यातील अंतर ०.०८६ अंश होते.

 
 

गुरू हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो, तर शनिला २९.५ वर्ष लागतात. या दोन्हीचा परिणाम असा होतो की, सुमारे १९ वर्ष आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होती. पण प्रत्येक महायुतीच्या वेळी या दोन्ही ग्रहामधील अंतर वेगवेगळे असतात. या दोघांची युती बघणे आपल्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असेल. तुलना करायची झाल्यास नुसत्या डोळ्यांनी बघताना सप्तर्षी तारका समूहातील ६ वा तारा वशिष्ठ हा एक तारा नसून दोन तारे आहेत. वशिष्ठ आणि अरूंधती हे तारे एकमेकांपासून ०.२ अंश दूर आहेत. या दोन्ही ताऱ्यांना वेगवेगळे बघता येणे हे दृष्टी चांगली असल्याच लक्षण मानण्यात येते.

 

या पूर्वी २४ ऑक्टोबर १६८२ आणि त्यानंतर लगेच ९ फेब्रुवारी १६८३ रोजी यांच्यातील अंतर वशिष्ठ आणि अरूंधती यांच्या अंतरापेक्षा कमी होते. त्यावेळी हे दोन्ही ग्रहांचे वक्रीभवन चालू होते आणि आता ३३८ वर्षांनी पहिल्यांदाच हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत. यानंतर हे दोन्ही ग्रह इतके जवळ परत १५ मार्च २०८० रोजी येतील. खरतर मानवी डोळ्याची क्षमता ०.०२५ अंश दूर असलेल्या दोन बिंदूंना वेगवेगळी बघण्याइतकी आहे. पण कधी शारीरिक व्याधीमुळे तर कधी वयोमानामुळे क्वचितच काही लोकांमध्ये ही क्षमता अढळते.

 
 

डिसेंबर महिन्याच्या ३ऱ्या आठवड्यात आपण काय बघू ?

सध्या आकाशात सूर्यास्तानंतर गुरू आणि शनि हे ग्रह आपल्याला दिसत आहेत. १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारे ३० मिनिटांनी आपल्याला पश्चिम क्षितिजावर बारीक चंद्र कोर दिसण्याची शक्यता आहे. मग दुसऱ्या दिवशी चंद्राची कोर आपल्याला या दोन्ही ग्रहांच्या बरोबर खाली दिसेल. मग १७ तारखेला चंद्राची कोर गुरू आणि शनिच्या वर दिसेल. पुढे दोन दिवस म्हणजे १९ तारखेपर्यंत हे दोन्ही ग्रह आपल्याला सहज वेगळे दिसू शकतील. त्यानंतर २० ते २३ तारखेपर्यंत यांच्यातील कोनीय अंतर वशिष्ठ आणि अरूंधती यांच्या कोनीय अंतरापेक्षा कमी असेल.

या युतीमध्ये शुभ किंवा अशुभ असे काही ही नाही. या दोघांच्या जवळ येण्याने जो गुरूत्वीय प्रभाव पडेल तो तुमच्या शेजारी १०० किलो वजनाच्या व्यक्तीच्या गुरुत्वीय प्रभावापेक्षा कमीच असेल. जर याचा काही प्रभाव पडेल तर तो इतकाच की, या ऐतिहासिक युतीचे साक्षीदार होण्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121