फाशीच होणार : आरोपी पवन गुप्ताची याचिका फेटाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2020
Total Views |
mmmk _1  H x W:

सर्वोच्च न्यायालयात पवन गुप्ताच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण



नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणी पवन गुप्ताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. या घटनेवेळी तो अल्पवयीन असल्याचे मत आरोपीच्या वकीलांनी नोंदवत याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावत फाशी कायम ठेवली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. भानुमति, न्या. अशोक भूषण, न्या. ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे सोमवारी ही सुनावणी झाली. निर्भयाच्या आईने आरोपी कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचे म्हटले आहे. या चारही नराधमांना १ फेब्रुवारी रोजी फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

एकमेव साक्षीदाराविरोधात एफआयआरची मागणी

निर्भयाचा मित्र आणि या प्रकरणातील एकमेव साक्षीदार याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी आरोपी पवन गुप्ताच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने पैसे घेऊन जबाव नोंदवल्याचा आरोप गुप्ता यांनी केला होता. मात्र, ही याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती.

 

आरोपी ढसाढसा रडला

मृत्यू समोर दिसू लागल्यानंतर आरोपी आरोपी पवन शर्माला पश्चात्ताप होऊ लागला आहे. पटीयाला न्यायालयात डेथ वॉरंट निघाल्यानंतर त्याने परिवाराला भेटण्याची विनंती केली होती. यावेळी कुटूंबातील व्यक्तींना भेटून तो ढसाढसा रडू लागला. यावेळी त्याची आई आणि आजी दोघे उपस्थित होते. दरम्यान, आरोपींच्या फाशीची संपूर्ण तयारी सुरू झाली आहे. चौघांनाही तिहार तुरुंगात सेल क्रमांक ३ येथे ठेवण्यात आले आहे. चौघांनाही एकत्र फाशी दिली जाणार आहे.









@@AUTHORINFO_V1@@