जॅक मा यांची 'सेकंड इनिंग'!

    11-Sep-2019   
Total Views | 70



आपल्या कृत्यातून अनेकांना कायम प्रेरणा देत राहिलेल्या जॅक मा यांनी निवृत्तीचा दिवसही असाच अनोखा निवडला. १० सप्टेंबर चीनमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा वाढदिवसही याच दिवशी, निवृत्तीचा दिवसही तोच.


जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशी ओळख असलेले चीनमधील 'अलिबाबा' उद्योगसमूहाचे संस्थापक जॅक मा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या वयाच्या ५५व्या वर्षी पदभार सोडल्यानंतरही ते या कंपनीच्या सदस्यत्वावर कायम राहणार आहेत. अलिबाबा समूहाच्या एकूण ३६ भागीदारी कंपन्यांच्या बहुतांश संचालकांचा कार्यभार ते पाहतात. ४८० अब्ज डॉलर इतक्या भांडवलाची असलेली ही कंपनी आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सातव्या स्थानी आहे. त्यामुळेच जॅक मा यांच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर याबद्दलचे संकेत वर्षभरापूर्वीच त्यांनी दिले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु होता. डॅनिअल झँग हे अलिबाबाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी. "माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण ऑफीसच्या टेबलवर काम करण्यात जावा, अशी माझी मुळीच इच्छा नाही, त्याऐवजी मी एखाद्या समुद्रकिनारी मरणे पसंत करेन." जॅक मा यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयुष्याच्या उर्वरित क्षणांना मी वेगळ्या पद्धतीने व्यतीत करू इच्छित असल्याचे ते म्हणाले होते. वय वर्ष ५५ असतानाही स्वतःला कायम तरुण मानणाऱ्या या उद्योजकाने उतारवयात नव्या बऱ्याच गोष्टी करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या सगळ्यात आपल्या आयुष्याची दुसरी इनिंगही ते तितक्याच जोमात जगतील, हे निश्चित. मात्र, त्यांच्या या निवृत्तीला अनेकांनी आता चीनमधील व्यापारस्थिती, जागतिक मंदी आणि इतर कारणांची किनार जोडून साशंकतेच्या भोवऱ्यात ढकललेले दिसते. पण, चर्चांकडे दुर्लक्ष करत जॅक मा यांनी या साऱ्यापासून दूर जात एका नवीन आयुष्याचा शुभारंभ केला.

 

आपल्या कृत्यातून अनेकांना कायम प्रेरणा देत राहिलेल्या जॅक मा यांनी निवृत्तीचा दिवसही असाच अनोखा निवडला. १० सप्टेंबर चीनमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा वाढदिवसही याच दिवशी, निवृत्तीचा दिवसही तोच. जॅक मा यांच्या निवृत्तीनंतर या योगायोगाचीही चर्चा झाली. एका गरीब परिवारातून जन्म घेतलेल्या जॅक मा यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक यशस्वी आणि आघाडीचा उद्योजक म्हणून नाव कमावले. त्यांची आजघडीला संपत्ती ३९ अब्ज डॉलर इतकी आहे. १९९९ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी ते इंग्रजीचे शिक्षक होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा आहे. शिक्षणव्यवस्थेवर परखडपणे मत व्यक्त करणारी ती एकमेव व्यक्ती. "मुलांना स्पर्धेत धावणारा रोबोट बनविण्यापेक्षा एक स्वतंत्र मूल्य जपणारा माणूस बनवा," असे आवाहन त्यांनी जागतिक पातळीवर केले होते. या शिक्षणपद्धतीवर ताशेरे ओढत ही पद्धत न बदलल्यास भविष्य अंधकारमय असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. आपल्या या दुसऱ्या इनिंगमध्ये ते या क्षेत्रासाठीही योगदान देतील, हे निश्चित. आत्तापर्यंत त्यांनी यासाठी कोट्यवधींचे दान केले आहे. आता पुन्हा एक शिक्षक म्हणून या क्षेत्रात परतणार आहेत. चीनमधील एका शहरातील लहानशा खोलीत 'अलिबाबा'ची सुरुवात झाली होती. त्याकाळी छोट्या व्यापाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी एका मंचावर आणले होते.

 

आज अलिबाबा कंपनीचा जागतिक विस्तार आणि पसारा निर्माण करण्यात जॅक मा यांचा मोठा वाटा आहे. मात्र, अलिबाबा भारतात पाय रोवू इच्छित असताना हा निर्णय कंपनीसाठी धक्कादायकच म्हणावा लागेल. जॅक मा यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला अनोखा चार तासांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. अलिबाबाचे संस्थापक जॅक मा एक रॉकस्टार बनले होते. कार्यक्रमाला हातात गिटार घेऊन पोहोचले. 'यु राईज मी अप' हे गाणं गाताना भावूक झाल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या कर्मचाऱ्यांना संदेश देताना एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचे ते म्हणाले. आपल्या या भाषणातून त्यांनी आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टीच इतरांना प्रदान केली. आपल्या कामाच्या स्पर्धेत धावत असताना आपण आयुष्यातील बराचसा वेळ हा जगणेच विसरून जात असतो, किंबहुना इतरांची स्वप्ने पूर्ण करताना स्वतःच स्वप्न पाहायला विसरतो. पुढील आयुष्याचा प्रत्येक दिवस आनंदी राहून स्वतःसाठी जगण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. त्यांच्या या दुसऱ्या इनिंगमधूनही शिकण्यासारखं खूप काही आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121