शिव वल्लभ गुजर हा तरुण डोंबिवलीला राहणार असून मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी त्याने कर्जतकडून येणारी ८ वाजून ५० मिनिटांची जलद लोकल पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कोपर रेल्वे स्थानकाजवळ त्याचा लोकल डब्यातून तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. डाऊन दिशेकडून येणाऱ्या लोकलच्या मोटरमनने या घटनेची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर काही वेळाने रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिव वल्लभ गुजरचा मृतदेह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात नेला असल्याेची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा संताप त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.