लक्ष्मण पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
17-May-2025
Total Views |
सोलापूर : ( Laxman Pawar ) माळशिरस तालुक्यातील गिरझणी गावातील भूमिपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील जवान लक्ष्मण पवार (वय 33) यांच्यावर शुक्रवार, दि. 16 मे रोजी त्यांच्या मूळ गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना दि. 13 मे रोजी हुतात्मा झालेल्या या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला. सकाळी 10 वाजता जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आले. यानंतर अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमीकडे निघाली. जवान पवार यांचे बंधू विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला.
लक्ष्मण पवार भारतीय सैन्यदलात ’नायक’ या रँकवर पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे कर्तव्य बजावत होते. दि. 13 मे रोजी कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाने गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.