‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ समजून घेताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |




इंटरमिटन्ट फास्टिंग’ (IF) म्हणजे खाणे आणि उपवास यांचा समावेश असलेले आहाराचे वेळापत्रक. यालाइंटरमिटन्ट कॅलरी रिस्ट्रिक्शनअसेही म्हणता येईल. अशा प्रकारच्या आहारपद्धतीमध्ये आपण ‘काय खातोयाहूनकधी खातोयावर अधिक लक्ष केंद्रित केलेले असते. त्यामुळे या प्रकारालाडाएटम्हणजे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. त्यापेक्षा आहाराचापॅटर्नकिंवावेळापत्रकहे नाव त्याला अधिक साजेसे ठरेल. कोणत्याही परिपूर्णडाएट प्लानचे तीन प्रमुख घटक असतात. काय खावे आणि काय खाऊ नये - किती प्रमाणात खावे - कधी खावे.

आएफ डाएट वेळापत्रकहे वजन कमी करण्याची इच्छा असणार्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. उपवास केल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबीच्या पेशी विघटित होतात आणि त्याद्वारे शरीराला आवश्यक ती ऊर्जा देतात, ज्याची परिणती वजन घटण्यामध्ये होते. उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांच्या संदर्भात विचार केला तर अशा प्रकारच्याआहार वेळापत्रकासाठी किंवापॅटर्नसाठी अधिक संशोधनाची गरज आहे.


इंटरमिटन्ट फास्टिंगकरण्याच्या विविध पद्धती

) ‘१६/या पद्धतीमध्ये तुम्ही दिवसातले आठ तास खाऊ शकता आणि त्यासोबत १६ तास उपवास करता. ठरलेल्या आठ तासांच्या काळात तुम्ही तीन-चार वेळा खाऊ शकता. तसेच उपवासाच्या कालावधीमध्येही पाणी, बिनसाखरेचे लिंबूपाणी, ग्रीन टी इत्यादी शून्य कॅलरी असलेली पेये अधूनमधून पित राहू शकता. या पद्धतीलाटाईम रेस्ट्रिक्टेड फीडिंगकिंवा वेळेच्या विशिष्ट मर्यादेत खाणे असे म्हणता येईल.

) आठवड्यात दोन दिवस उपास करण्याच्या पद्धतीला: मेथड ऑफ इंटरमिटन्ट फास्टिंगअसे म्हणतात. या पद्धतीमध्ये उपवासाच्या दिवशी कमीत-कमी कॅलरीजचे सेवन केले जाते आणि उरलेल्या पाच दिवसांमध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू-खाऊ शकता. एका दिवसाआड उपवास केल्यामुळे एक एक दिवस सोडून तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता.

) ‘वॉरिअर डाएटया पद्धतीमध्ये तुम्ही संपूर्ण दिवसभरात अत्यंत कमी कॅलरी असलेले पदार्थ खात आणि रात्री कॅलरीजनी समृद्ध आहार घेता. डाएटवर जाण्याची योजना आखताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी कोणत्याही प्रकारच्या डाएटची योजना आखण्यापूर्वी तुम्ही एखाद्या नोंदणीकृत किंवा योग्य अर्हता असलेल्या आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायलाच हवा. कारण, कोणत्याही दोन व्यक्तींचाडाएट प्लानएकसारखा असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक गरजांनुसार तो आखला जातो, ज्यात त्या व्यक्तीची प्रकृती आणि तिला काय परिणाम साधायचा आहे, हे स्पष्टपणे समजून घेण्यात आलेले असते. फास्टिंग/ आएफचा परिणाम सिद्ध होण्यासाठी अद्याप आणखी पुराव्यांची गरज आहे.

इंटरमिटन्ट फास्टिंगचे फायदे

काही अभ्यासांतून असे सुचविण्यात आले आहे की, उपवासामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते त्यामुळे वजन घटते. अधिक तासांसाठी उपवास केल्याने शरीरात जाणार्‍या कॅलरीजच्या संख्येवरही मर्यादा येते. उपवासामुळेटाइप-प्रकारच्या मधुमेहाचा तसेच जीवशैली लठ्ठपणाशी संबंधित इतर आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. पण, या गोष्टीला पुष्टी देण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

इंटरमिटन्ट फास्टिंगमधील दोष

भरपूर तास उपवास केल्याने तुमच्याबेसल मेटॅबॉलिक रेट’ (BMR) मध्ये घट होते त्यामुळे चरबी साठण्याची आणि वजन वाढण्याचीही शक्यता असते. उपवासामुळे नंतर मनसोक्त खाणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाणे होऊ शकते. कारण, बराच काळ उपवास केल्यानंतर खूप भूक लागते. तेव्हा खाण्यासाठी ठेवलेल्या कालावधीमध्ये खाण्याचे घास किंवा प्रमाण यांवर नियंत्रण ठेवणे हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नांतील महत्त्वाचा भाग आहे. उपवासामुळे तुम्हाला थकल्यासारखे, अशक्त वाटू शकते तुमची चिडचिड होऊ शकते.

- रसिका परब

(लेखिका फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील न्यूट्रिशन थेरपी विभागाच्या प्रमुख आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@