‘बेस्ट’चे चाक खोलातच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2019
Total Views |





बेस्ट’ उपक्रम, त्याचा परिवहन विभाग आणि त्या विभागाचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस खोलवर जाताना दिसतो. त्या तोटारूपी खड्ड्यात रुतलेले ‘बेस्ट’चे चाक बाहेर कधी येणार, याचीच चिंता सध्या सर्वांना भेडसावत आहे.



मुंबईत कोसळणारा पाऊस
, येथील रस्ते आणि रस्त्यातील खड्ड्यांचे जणू एक अतूट नाते. अनेकदा तर वाहनांची चाके गती न घेता खड्ड्यातच गरगरत राहतात. त्याचप्रमाणे ‘बेस्ट’ उपक्रम, त्याचा परिवहन विभाग आणि त्या विभागाचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस खोलवर जाताना दिसतो. त्या तोटारूपी खड्ड्यात रुतलेले ‘बेस्ट’चे चाक बाहेर कधी येणार, याचीच चिंता सध्या सर्वांना भेडसावत आहे.



‘बेस्ट’च्या अर्थसंकल्पात २०१८-१९ मध्ये ३८०.३७ कोटींची तूट होती. हीच तूट २०१९-२० मध्ये ८३३.८५ कोटी झाली. म्हणजे ४५५ कोटींनी वाढली. २०२०-२१चा अंदाज वर्तविताना २२५० कोटी रुपये तूट आहे. म्हणजे चालू वर्षाच्या तुलनेत पुढील वर्षासाठी (२०२०-२१ साठी) १,४१७ कोटी रुपये अधिक तूट दर्शविण्यात आली आहे. ‘बेस्ट’ म्हटली की, सर्वसामान्य प्रवाशांच्या समोर ‘बेस्ट’चे ड्रायव्हर-कंडक्टर आणि थांब्यावर उभे असणारे निरीक्षक एवढेच चित्र असते. ‘बेस्ट’च्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे एकतर कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाहीत आणि जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांची रक्कमही त्यांना वेळेवर मिळत नाही. त्याचा एकूणच परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होताना दिसतो. शिवाय मागील काही वर्षांत नवीन गाड्या खरेदी केल्या नसल्यामुळे उपक्रमात गाड्यांचा ताफा कमी झाला असून गाड्या विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांकडून ड्रायव्हर-कंडक्टर यांना बोलणी खावी लागत आहेत.



कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सोयी
-सवलती कधीच बंद झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारीही हैराण आहेत. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने सुमारे २१०० कोटी रुपयांची मदत केली असली तरी कायम अशी मदत करणे महापालिकेला शक्य होणार नाही. तिकीटदर कमी करून प्रवासी वाढले. परंतु, तोटा अधिक खोलवर चालला आहे. मार्च २०२० पर्यंत १८०० गाड्या ताफ्यात दाखल झाल्या तरी तोटा भरून निघणार नाही आणि अटी पूर्ण केल्याशिवाय अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होणार नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या बेस्टचे चाक गतिमान कधी होणार, हाच प्रश्न आहे.



कशासाठी हा अट्टाहास
?



सध्याची
‘बेस्ट’ची आर्थिक अवस्था लक्षात घेता ‘बेस्ट’ बसेस लवकरच इतिहासजमा होणार की काय, अशी चिंता एका ‘बेस्ट’ समिती सदस्याने खासगीत बोलताना व्यक्त केली. त्यांची ही चिंता पूर्णत: अव्हेरून चालणार नाही. त्यांच्या या चिंतेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ‘बेस्ट’चा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला म्हणून कर्मचार्‍यांच्या सोई-सवलती बंद करण्यात आल्या आहेत. त्यांची देणीही वेळेत देता येत नाहीत. इतकेच नव्हे तर निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांच्या जागी भरती करणेही बंद केले आहे. अशावेळी ‘बेस्ट’ प्रशासनानेही अनावश्यक उधळपट्टी रोखायला हवी.



१८७४ पासून ट्रामच्या रूपात सुरू झालेल्या
‘बेस्ट’च्या सेवेचे संग्रहालय आणिक आगार येथे असताना, ट्रामचा एक डबा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील भाटिया गार्डनमध्ये उभारण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न ‘बेस्ट’चे आर्थिक गणित माहीत असणारा कोणीही विचारू शकेल. वर्षातले ३६५ दिवस पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना ’बेस्ट’ सेवा देणार्‍या ’बेस्ट’च्या जुन्या गाड्यांचे संग्रहालय ’बेस्ट’च्या आणिक आगारमध्ये आहे. घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्रामपासून सिंगलडेकर, डबलडेकर बसच्या चालत्या प्रतिकृती, तिकिटांचा मोठा संग्रह, कृष्णधवल छायाचित्रे असे बरेच काही आहे. १८७३ मध्ये घोड्यांद्वारे ओढली जाणारी ट्राम, त्यानंतर इंजिन जोडण्यात आलेली ट्राम, सिंगल डेकर ट्राम, डबलडेकर ट्राम येथे चलतचित्ररूपात पाहायला मिळतात.



कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी १९२६ मध्ये सुरू झालेली ओम्नी बससेवा
, दक्षिण मुंबईत १९२८ साली सुरू झालेली चार बंक साइड सीन सर्व्हिस ही टुरिस्ट बस, १९३७ ची डबलडेकर बस आणि त्यानंतर बदलण्यात आलेले मॉडेल येथे मांडण्यात आलेले आहे. तरीही ट्राम सेवेतील एक डबा पुनरुज्जीवित स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील भाटिया बागेत ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवापासून त्याच्यासाठी पाया उभारणीचे कामही सुरू आहे. त्यासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च येणार आहे. आणिक आगारात संग्रहालय असताना या डब्याचे प्रदर्शन करण्यावर उधळपट्टी कशासाठी? हाच पैसा ’बेस्ट’च्या अन्य कामासाठी वापरणे सोयीस्कर ठरले नसते का, हाच प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

-अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@